कथित गर्लफ्रेंड पलक तिवारीच्या भावासोबत इब्राहिम अली खानची मस्ती; व्हिडीओ व्हायरल
टीव्ही इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण श्वेताची लेक पलक तिवारी देखील तेवढीच चर्चेत असते. नुकताच पलकचा ‘द भूतनी’ चित्रपटाची स्क्रीनिंग होती.स्क्रीनिंगदरम्यान सर्वांच लक्ष वेधलं ते सैफ अली खानचा मुलगा अभिनेता इब्राहिम अली खानने. पलक तिवारीला शुभेच्छा देण्यासाठी इब्राहिम अली खान चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचला होता. या स्क्रिनिंगमध्ये ते एकत्र दिसताच, दोघांमधील प्रेम आणि नात्याबद्दलच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. इब्राहिम अली खानचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी वेगवेगळ्या चर्चा करायला सुरुवात केली आहे.
दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण या दोघांनीही त्यांचे नाते स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी ते चांगले मित्र आहेत असं सांगितलं. चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान इब्राहिमला पाहून सर्व चाहते पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रश्न विचारू लागले आहेत.
कार्यक्रमात एकमेकांशी बोलणे टाळले
बुधवारी, इब्राहिम पलकसोबत तिच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गेला होता, यावेळी तिची आई श्वेता तिवारी आणि तिचा सावत्र भाऊ रेयांश कोहली देखील उपस्थित होता. इब्राहिमने कार्यक्रमासाठी काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळा डेनिम जीन्स असा पेहराव केला होता. पापाराझींसमोर इब्राहिमने पलकसोबत फोटो काढणे टाळले. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये पलक खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने तिच्या आई आणि भावासोबत आनंदाने पोजही दिली. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही दोघेही एकमेकांपासून खूप दूर दिसत होते.
पलकच्या भावासोबत दिसले खास रिलेशन
स्क्रिनिंगच्या एका व्हिडिओमध्ये, इब्राहिम पलकचा भाऊ रेयांशसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. त्यात ते हसत आहेत आणि एकमेकांना हाय-फाइव्ह देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये इब्राहिम रेयांशसोबत मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओने अनेकांची मने जिंकली. सोशल मीडिया युजर्स हार्ट इमोजींची कमेंट्स करत आहेत. त्याच व्हिडिओमध्ये, पलक देखील तिच्या मैत्रिणींना भेटताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘प्रेम लपवता येत नाही’, तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, ‘प्रेयसीच्या भावासाठीही इतके प्रेम.’ तर अजून एका युजरने लिहिलं आहे की, ‘जर प्रेम असेल तर ते इब्राहिम आणि पलकसारखे असले पाहिजे.’
अनेकदा एकत्र दिसतात
इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी हे त्यांच्या नात्याची कबुली देत नसले तरी ते सतत एकत्र दिसतात. सार्वजनिक कार्यक्रमांपासून ते डेट नाईट्सपर्यंत दोघेही एकत्र दिसतात. यामुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्या पसरत असतातच. मात्र फिल्मफेअरशी बोलताना इब्राहिमने अखेर डेटिंगच्या अफवांवर स्पष्टीकरण देत ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत हे स्पष्ट केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List