WAVES 2025 : चॅटजीपीटीवरून कुकने लिहिली ‘मिस्टर इंडिया 2’ ची स्क्रिप्ट; शेखर कपूर यांचा मोठा दावा

WAVES 2025 : चॅटजीपीटीवरून कुकने लिहिली ‘मिस्टर इंडिया 2’ ची स्क्रिप्ट; शेखर कपूर यांचा मोठा दावा

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (Waves) ची मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. आज (1 मे ) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झालं.शाहरुख खान, आमिर खान, अनिल कपूर, रजनीकांत, रणबीर कपूर यांच्यासह दाक्षिणात्य ते बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्सनी या कार्यक्रमात विशेष हजेरी लावली. बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर हे देखील आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. न्यूज9ने आयोजित केलेल्या Wave समिटमध्ये टीव्ही9 नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरूण दास यांनी दिग्दर्शक शेखर कपूर यांची मुलाखत घेतली. त्यांनी अनेक विषयांवर संवाद साधला.

AI च्या प्रभावाबद्दलही त्यांची चर्चा झाली. ‘ खरं सांगू तर AI राक्षस नाहीये, (पण) आपण त्याला राक्षस बनवलं आहे. जे काम आपण 5 महिन्यांत करू शकतो तेच काम AI (हे) 5 मिनिटांत करू शकतं. मी नेहमीच ChatGPT शी बोलत असतो आणि तेही माझ्याशी बोलतं. AI अनिश्चित असू शकत नाही कारण ते डेटाद्वारे चालतं, पण आपण (माणसं) तसे नाहीयोत ‘ असं शेखर कपूर म्हणाले.

कूकने लिहीली फिल्मची स्क्रिप्ट

यावेळी शेखर कपूर यांनी ‘Storytelling in the age of AI (एआयच्या युगात स्टोरीटेलिंग)’ या विषयावरही चर्चा केली. यादरम्यान ते म्हणाले की, ‘मिस्टर इंडिया 2’ चित्रपटासाठी अनेक लोक त्यांच्याकडे पटकथा, स्क्रिप्ट घेऊन आले होते. पण त्यांच्या कूकने एक चांगली स्क्रिप्ट लिहीली होती. शेखर कपूर यांनी जेव्हा त्या कूकला याबद्दल विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की त्याने ही स्क्रिप्ट ChatGPT द्वारे लिहीली.

WAVE समिट कधीपर्यंत ?

हे समिट चार दिवसांपर्यंत चालेल. 4 मे रोजी या कार्यक्रमाचा समारोप होईल. येत्या चार दिवसांत आणखी अनेक मोठमोठ कलाकारा, सेलिब्रिटी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधताना दिसतील.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘WAVES 2025… क्रिएटिव कॉन्टेंटचे लॉन्चिंग पॅड बनतंय…’ सुपरस्टार अल्लू अर्जुनकडून गौरव ‘WAVES 2025… क्रिएटिव कॉन्टेंटचे लॉन्चिंग पॅड बनतंय…’ सुपरस्टार अल्लू अर्जुनकडून गौरव
मुंबईत आजपासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) ला सुरुवात झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या समिटमध्ये अनेक बडे...
IPL 2025 – मुंबईने राजस्थानला लोळवलं; 100 धावांनी केला पराभव, पटकावला पहिला क्रमांक
‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले?
WAVES 2025: 10 व्या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचा मोठा अपघात, 6 महिने घरात बसण्याचा सल्ला पण..
Javed Akhtar : आता आर नाही तर पार… लक्षात राहील असं उत्तर द्या,अद्दल घडवा ! पहलगाम हल्ल्यानंतर संतप्त जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी
कलिंगड खरेदी करताना या ‘पाच’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे आरोग्य येऊ शकते धोक्यात!
‘पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी