आईचा तोल गेला.. बाळ 21 व्या मजल्यावरून कोसळले, विरारमधील दुर्दैवी घटना

आईचा तोल गेला.. बाळ 21 व्या मजल्यावरून कोसळले, विरारमधील दुर्दैवी घटना

खिडकी बंद करताना खांद्यावरील सात महिन्यांचे बाळ थेट 21 व्या मजल्यावरून कोसळल्याची दुर्दैवी घटना विरारमध्ये घडली. त्यात बाळाचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान लहान मुलांना सांभाळा.. त्यांची काळजी घ्या.. असे आवाहन करण्यात आले आहे.

विरार पश्चिमेच्या बोळींज येथे जॉय विले नावाचे निवासी संकुल आहे. या संकुलात पिनॅकल नावाची इमारत असून 21 व्या मजल्यावरील 2104 या सदनिकेत विकी सदाने आणि पूजा सदाने हे दाम्पत्य राहते. त्यांना 7 महिन्यांचे बाळ होते. बुधवारी दुपारी सवातीनच्या सुमारास पूजा सदाने या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या. मात्र खिडकीजवळ पाणी पडल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला. यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ 21 व्या मजल्यावरून थेट खाली पडले. या दुर्घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे सदाने दाम्पत्याला 7 वर्षांनंतर बाळ झाले होते. मंगळवारी बाळाला 7 महिने पूर्ण झाले होते.

खिडकीला जाळी नसल्याने घात
बुधवारी विकी सदाने नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. बाळाला बघण्यासाठी नातेवाईक घरात आले होते. महिला खिडकी बंद करताना तिचा तोल गेला आणि खांद्यावरील बाळ खाली पडले, अशी माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली. या खिडकीला पूर्ण जाळी नव्हती. त्यामुळेच घात झाल्याचे बोलले जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आरोग्य मंत्रालय कर्मचारीही कामावर आरोग्य मंत्रालय कर्मचारीही कामावर
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुट्टय़ा पुढील आदेश मिळेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. निर्धारित सुट्टय़ाही...
जनाबाई तारे यांचे निधन
चिनाब नदीवरील चार जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग
सिंधू जल कराराबाबत हस्तक्षेप करण्यास जागतिक बँकेचा नकार; पाकिस्तानची विनंती फेटाळली
India Pakistan War पाकिस्तानने केलेले तुर्कीच्या 400 ड्रोनचे हल्ले हाणून पाडले, प्रवासी विमानांची ढाल करून हल्ले
युद्ध परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार
लष्करप्रमुखांना तीन वर्षांसाठी सर्वाधिकार, संरक्षण मंत्रालयाची अधिसूचना