वारंवार जांभई येणे सामान्य गोष्ट नाही, असू शकतात ‘या’ आजारांची लक्षणे

वारंवार जांभई येणे सामान्य गोष्ट नाही, असू शकतात ‘या’ आजारांची लक्षणे

रोजच्या धावपळीच्या कामात आपण खूप थकतो, त्यामुळे अनेकदा आपण दिवसभरात थकल्यावर व झोप आल्यावर जांभई देतो. त्यात थकल्यामुळे जांभई येणे खुप सामान्य आहे. अशातच तुम्हाला दिवसभर वारंवार जांभई येत असेल. त्यात अनेकजण हा थकवा दुर करण्यासाठी दुपारपर्यंत अनेक कप कॉफी पित असाल आणि तुम्ही हा तुमच्या दिनचर्येचा भाग बनवला तर हा सामान्य थकवा नसून गंभीर आरोग्याच्या समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे काही वैज्ञानिक अहवालानूसार, वारंवार जांभई येणे हे झोपेच्या कमतरतेचे आणि झोपेच्या विकाराचे लक्षण असू शकते.

दिवसा जास्त झोप येणे ही केवळ आळस येत असेल तर त्यामुळे ड्रायव्हिंग अपघात, कामाच्या चुका, मानसिक समस्या आणि दीर्घकालीन आजार देखील होऊ शकतात. ही स्थिती बहुतेकदा अशा लोकांमध्ये दिसून येते ज्यांना पुरेशी आणि चांगली झोप मिळत नाही. त्यामुळे झोपेचा अभाव ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे, ज्यामुळे समाजात दररोज अपघात आणि आरोग्य समस्या वाढत आहेत.

वारंवार जांभई येण्याचे कारण

  • झोपेचा अभाव
  • झोपेचे विकार जसे की ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया किंवा नार्कोलेप्सी
  • ताण आणि नैराश्य
  • औषधांचे दुष्परिणाम
  • अनियमित जीवनशैली आणि रात्री उशिरा स्क्रीन टाइम
  • आरोग्यास कोणते धोके निर्माणी होऊ शकतात?
  • मानसिक थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यात समस्या
  • गाडी चालवताना अपघातांचा धोका वाढतो
  • कामाच्या ठिकाणी चुका होणे
  • नैराश्य आणि आत्महत्येचे विचार
  • सामाजिक वर्तनात बदल, जसे की चिडचिडेपणा आणि चिंता

ही समस्या कशी टाळायची?

  • दररोज किमान ७-८ तास झोप घ्या.
  • नियमित झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठेवा.
  • झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा.
  • कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा.
  • गरज पडल्यास झोप तज्ञाचा सल्ला घ्या.

डॉक्टरांच्या मते, वारंवार जांभई येणे हे केवळ थकव्याचे लक्षण नाही तर शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नसल्याचा हा इशारा आहे. याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा आजार होऊ शकतो. म्हणून आजारांपासून दूर राहण्यासाठी झोपेला प्राधान्य द्या आणि निरोगी जीवनासाठी जागरूक रहा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कुख्यात गुन्हेगाराला भरवला केक! विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कुख्यात गुन्हेगाराला भरवला केक!
‘विधानसभा उपाध्यक्षपदावर असल्याने आता व्यवस्थित वागले पाहिजे,’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्याला अण्णा बनसोडे यांनी केराची टोपली दाखविल्याचे समोर...
Pahalgam Terror Attack पहलगामचा बदला कधी? दिल्ली आणि इस्लामाबादेत सध्या बैठकांवर जोर
एजाज खानला पाठवणार समन्स
देशभरात उद्या मॉकड्रील, ब्लॅकआऊट होणार… युद्धाचा सायरन वाजणार
एक साडेचार फुटांचा मंत्री…वडेट्टीवार यांचा नितेश राणेंना टोला
गणरायाच्या पीओपी मूर्तींवर सरकार प्रसन्न! राज्याच्या अहवालावर भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश…
नीट काम करा नाहीतर तुमची जागा रोबो घेईल, अजितदादांनी कर्मचाऱ्यांना झापले