छोट्या शेफ ‘राहा’ ने आई आलिया भट्टसाठी बनवलं 7 कोर्स जेवण, पोस्ट पाहून चाहते म्हणाले, खूपच छान

छोट्या शेफ ‘राहा’ ने आई आलिया भट्टसाठी बनवलं 7 कोर्स जेवण, पोस्ट पाहून चाहते म्हणाले, खूपच छान

बॉलिवूडमध्ये जे कुटुंब प्रसिद्ध आहेत त्यांच्यातील एक म्हणजे कपूर कुटुंब. कपूर कुटुंब सतत या ना त्या कारणाने चर्चे असतं. त्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे सातत्याने चर्चेत असतात. आणि आता त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती आता पापाराझांची लाडकी झाली आहे ती म्हणजे राहा कपूर. आलिया आणि रणबीरसोबतच राहा देखील मीडियासाठी महत्त्वाची आहे. आलिया राहासोबतचे फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असायची पण आता ती शक्यतो सुरक्षेच्या कारणास्तव राहाचे फोटो शेअर करणे टाळते.

आलियासाठी लेकीने बनवले 7 कोर्स जेवण 

पण आलियाने आता लेकीचे कौतुक करणारा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून सर्व नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केलं आहे. आलियाच्या लेकीने चक्क तिच्यासाठी जेवण तयार केलं आहे. दोन वर्षांच्या राहाने आलियासाठी तयार केलेल्या जेवणाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून आलियाने पोस्टला कॅप्शन दिले आहे की, “माझ्या आवडत्या शेफने प्रेमाने माझ्यासाठी 7 कोर्स जेवण बनवलं आहे.”या फोटोत एक सुंदर समजवलेला डायनिंग टेबल दिसत आहे. ज्यामध्ये खेळण्याच्या रंगीबेरंगी मातीपासून जेवणाचे पदार्थ बनवलेले दिसत आहे. आलिया-रणबीरच्या दोन वर्षांच्या मुलीने तिच्या कल्पनेनुसार जेवण बनवल्याचे दिसत आहे. त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे.

Alia Bhatt daughter Raha cooked

Alia Bhatt daughter Raha cooked

आलियाने राहाची फोटोग्राफीचीही एक बाजू देखील दाखवली

आलिया-रणबीरची लेक नेहमीत काहीना काही कारणांनी चाहत्यांची मने जिंकत असते. ती तिच्या आई-वडिलांबरोबर दिसते, तेव्हादेखील ती पापाराझींचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. आलियाने राहाची फोटोग्राफीची एक बाजू देखील दाखवली जेव्हा तिने राहने आलियाचा तिची मांजर एडवर्डसोबतचा फोटो काढला होता. हा फोटो शेअर करत आलियाने लिहिले कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, “माझ्या एका राजकुमारीसोबतचा फोटो, जो माझ्या राजकुमारीने क्लिक केला आहे.”

मुलीच्या सुरक्षिततेसाठी आलिया-रणबीरने घेतलेला एक निर्णय 

आलिया आणि रणबीर कपूर यांनी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर एप्रिल 2022 मध्ये लग्न केलं होतं. त्यांची मुलगी राहाचा जन्म नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. 2023 च्या ख्रिसमसला, रणबीर आणि आलियाने राहाला मीडियासमोर आणलं. अलिकडेच, आलियाने तिच्या सोशल मीडियावरून तिच्या लेकीचे सर्व फोटो काढून टाकले ज्यात तिचा चेहरा दिसत होता. हे पाहून चाहते चिंतेत पडले, पण नंतर मुलीच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘WAVES 2025… क्रिएटिव कॉन्टेंटचे लॉन्चिंग पॅड बनतंय…’ सुपरस्टार अल्लू अर्जुनकडून गौरव ‘WAVES 2025… क्रिएटिव कॉन्टेंटचे लॉन्चिंग पॅड बनतंय…’ सुपरस्टार अल्लू अर्जुनकडून गौरव
मुंबईत आजपासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) ला सुरुवात झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या समिटमध्ये अनेक बडे...
IPL 2025 – मुंबईने राजस्थानला लोळवलं; 100 धावांनी केला पराभव, पटकावला पहिला क्रमांक
‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले?
WAVES 2025: 10 व्या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचा मोठा अपघात, 6 महिने घरात बसण्याचा सल्ला पण..
Javed Akhtar : आता आर नाही तर पार… लक्षात राहील असं उत्तर द्या,अद्दल घडवा ! पहलगाम हल्ल्यानंतर संतप्त जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी
कलिंगड खरेदी करताना या ‘पाच’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे आरोग्य येऊ शकते धोक्यात!
‘पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी