‘त्या’ विधानानंतर चंद्रकांतदादांना बारामतीला यायला मज्जाव?,अजितदादांनी सांगितलं आतलं राजकारण

‘त्या’ विधानानंतर चंद्रकांतदादांना बारामतीला यायला मज्जाव?,अजितदादांनी सांगितलं आतलं राजकारण

Lok Sabha Election 2024 मध्ये राजकीय धुमशान सुरु आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले आहे. तळपत्या उन्हात महाविकास आघाडी आणि महायुतीने एकमेकांविरोधात आग ओकली आहे. एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी दोन्ही गटांनी सोडलेली नाही. अनेक ठिकाणी एकमेकांना खो देण्याचा प्रयत्न झाला आहे. तर भाजपने पण मित्रपक्षांना खो दिल्याचे अनेक मतदारसंघात समोर आले आहे. मतदारसंघचं पळविण्यात आले आहेत. त्यातच महायुतीतील एक अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. चंद्रकांतदादा विरुद्ध अजितदादा असा सामना झाला. त्यात आता एक सीमारेषा आखली गेली आहे.

दोन दादांत नाराजीचा सूर का?

निवडणुकीच्या धामधुमीत चंद्रकांत पाटील यांचे एक वक्तव्य फार चर्चेत आलं. “शेवटी राजकारणात एक तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलकं आहे, आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्याला शरद पवार यांचा पराभव हवा आहे. बाकी काही नको”, असं ते म्हणाले होते. एकप्रकारे चिमटाच त्यांनी काढला होता. त्यांच्या वक्तव्याने अजितदादा मात्र दुखावल्या गेले. त्यांनी या वक्तव्यावर त्यांची नाराजी बोलून दाखवली.

अजितदादांची नाराजी

“हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते”, असा टोला अजित पवार यांनी महायुतीच्या समन्वय बैठकीत हाणला. अर्थात त्यांचा रोख हा चंद्रकांत पाटील यांच्यावर होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. ही धुसफूस चव्हाट्यावर आल्यावर चंद्रकांतदादांनी अद्याप त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

चंद्रकांतदादांन बारामतीत येण्यास मज्जाव

शरद पवारांचा पराभव करणे हेच आमचे उदीष्ट हे चंद्रकांत पाटील यांचे विधान चुकीचे. त्यांची चुक झाली हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका. आम्ही पाहतो. त्यानंतर ते चुप आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांनी राजकीय बॉम्ब टाकला. काँग्रेसमध्ये अनेक पक्ष विलीन होऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले. राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत दिले.अजित पवार यांनी काकांचे विधान फारसे काही मनावर घेतले नाही. शरद पवार यांच्यासोबत दीर्घ राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. शरद पवार अथवा उद्धव ठाकरे हे काही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत. कधी कधी संभ्रम निर्माण होण्यासाठी ते असे विधान करतात, असा टोला त्यांनी हाणला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका
देशातील ४९ जागांवर मतदान सोमवारी सुरु झाले. त्यात महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान होत आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यातील मुंबईतील सहा...
अब तो अपना राज है, डरने की क्या बात…, अमिताभ बच्चन यांनी हटके स्टाईलमध्ये केलं मतदान करण्याचं आवाहन
Sambhaji Raje : जातीच्या मुद्यावरुन पाडापाडीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? Video
भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, ‘उमेदवाराला मतदान करताना…’
मतदान सुरु होण्यापूर्वीच अनिल अंबानी मतदानासाठी रांगेत, व्हिडिओ आला समोर
बड्या बिल्डरच्या मुलाच्या पॉश कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू
सांगली रेल्वेस्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ताब्यात, फलटणच्या तरुणाला मुंबईतून केली अटक