तीन वर्षांत दिलेली भोगवटा प्रमाणपत्र, भरलेल्या रकमेची पडताळणी करणार; नगर मनपा आयुक्त जावळे यांचा निर्णय

तीन वर्षांत दिलेली भोगवटा प्रमाणपत्र, भरलेल्या रकमेची पडताळणी करणार; नगर मनपा आयुक्त जावळे यांचा निर्णय

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून गेल्या तीन वर्षांत देण्यात आलेल्या सर्व भोगवटा प्रमाणपत्र व भरलेल्या प्रीमियमच्या रकमेची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली.

प्रीमियमची पावणेसहा कोटींची रक्कम न भरताच भोगवटा प्रमाणपत्र मिळवल्याच्या प्रकारानंतर आयुक्त जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. सावेडी उपनगरातील जुन्या दूध संघाच्या जागेत रहिवासी व वाणिज्य वापरासाठी उभारण्यात आलेल्या साई मिडास इम्पेरिओ टॉवर्सचे बांधकाम करणाऱया बिल्डरांनी प्रिमियमचे 5 कोटी 68 लाख रुपये न भरता, सदर रक्कम भरल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन भोगवटा प्रमाणपत्र मिळवत महापालिकेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. माजी नगरसेवक दीप चव्हाण व संजय घुले यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर जाग आलेल्या महापालिकेने या बिल्डरला सात दिवसांत रक्कम व्याजासह भरण्याचे आदेश दिले होते. या प्रकाराची आयुक्त जावळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रीमियमची संपूर्ण रक्कम न भरताच भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आल्याची आणखी काही प्रकरणे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांतील सर्व भोगवटा प्रमाणपत्र व भरलेल्या प्रीमियमच्या रकमेची पडताळणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त जावळे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;