वाहन अपघातात तरुणाचा मृत्यू
भरधाव डंपरने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हसनैन जाहीर हुसेन भाटकर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आर.ए.के. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
हसनैन हा शिवडी परिसरात राहत होता. तो डिलिव्हरी बॉय म्हणून एका फूड अॅप्स पंपनीत काम करत होता. गुरुवारी सकाळी तो वडाळा चार रस्ता येथून जात होता. तेव्हा वडाळा रेल्वे स्थानकाच्या दिशेने आलेल्या भरधाव वेगातील डंपरने त्याला धडक दिली. त्या धडकेत तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अपघाताची माहिती समजताच आरएके मार्ग पोलीस घटनास्थळी गेले. हसनैनच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पळून गेलेल्या डंपरचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List