84 वर्षीय वडिलांचा पालक होण्यासाठी मुलगी हायकोर्टात
84 वर्षीय वडिलांचा पालक होण्यासाठी मुलीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने जे.जे. रुग्णालयाला वडिलांची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
न्या. संदीप मारणे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हे आदेश दिले. जे.जे. रुग्णालयाने तज्ञ डॉक्टरांची टीम तयार करावी. या टीमने याचिकाकर्त्या मुलीच्या वडिलांची वैद्यकीय चाचणी करावी. या चाचणीचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. यावरील पुढील सुनावणी 27 मे 2024 रोजी होणार आहे. अदिती अमोद केतकर यांनी ही याचिका केली आहे. तिचे वडील प्रभाकर पटवर्धन यांना कर्परोग आहे. 7 एप्रिल 2024 रोजी त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यांची काळजी मी घेते. कारण आईचे पण वय झाले आहे. मी त्यांची एपुलती एक मुलगी आहे. ते एका पुनर्विकास प्रकल्पाचे प्रमोटर आहेत. त्यांच्या नावे स्थावर व जंगम मालमत्ता आहे. पुनर्विकास प्रकल्प व अन्य मालमत्तेचे व्यवहार हाताळण्यासाठी मला वडिलांचा पालक म्हणून नेमावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List