आपची दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयावर धडक; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

आपची दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयावर धडक; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

स्वाती मालीवाल यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना अटक करण्यात आल्यानंतर ‘आप’चे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात आज भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयावर धडक दिली. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ‘आप’चे नेते आणि कार्यकर्ते ‘आप’च्या कार्यालयात पोहोचले आणि अर्ध्या तासानंतर 800 मीटरवर असलेल्या भाजपा मुख्यालयाच्या दिशेने कूच केले.

मोदी सरकारच्या हुकूमशाही आणि दडपशाहीविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तसेच नेते आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही काळ तुरुंगात ठेवल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. ईडी, सीबीआय आणि आयटीच्या आडून विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटय़ा आरोपांच्या माध्यमातून तुरुंगात डांबणाऱया मोदी सरकारला केजरीवाल यांनी मोर्चा काढून थेट आव्हान दिले. कितीही दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलन आणखी उफाळून येईल, असा इशारा केजरीवाल यांनी दिला होता. त्यामुळे दिल्लीतील भाजप मुख्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते.

144 कलम लागू
केजरीवाल यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळू नये यासाठी पोलिसांना आधीच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश मोदी सरकारने दिले होते. त्यामुळे भाजपा मुख्यालयाबाहेर 144 कलम लागू करण्यात आले होते. येथून येण्या-जाण्याच्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे दिल्लीकरांची प्रचंड गैरसोय झाली.

भाजपाला विरोधकांना संपवायचे आहे – केजरीवाल
भाजपाने विरोधी पक्षांना संपवण्याचे तीन प्लॅन तयार केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. सर्वात आधी निवडणुकीनंतर विरोधी पक्षांची बँक खाती गोठवण्यात येतील. त्यानंतर पक्षाच्या मोठय़ा नेत्यांना अटक करण्यात येईल आणि मग पक्षाचे कार्यालय रिकामे करण्यात येईल, असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;