पुण्यात भरधाव पोर्शेने दोघांना चिरडले, तरुण तरुणीचा जागीच मृत्यू

पुण्यात भरधाव पोर्शेने दोघांना चिरडले, तरुण तरुणीचा जागीच मृत्यू

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे गाडीने दोन तरुणांना चिरडलं आहे. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अनिस अवधिया व मैत्रीण अश्विनी कोस्टा अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी वेंदांत अगरवाल या 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

अनिस अवधिया हा दोन दिवसांपूर्वीच परदेशातून पुण्यात आला होता. मिंत्रासोबत पार्टी करण्यासाठी तो कल्याणीनगर येथील बॉलर हॉटेल येथे आला होता. रात्री अडीचच्या सुमारास ते सर्व परत जात असताना एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या गाडीने दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या पोर्शे कारने अनिस व अश्विनीला मागून धडक दिली. या घडकेत दोघांचाही मृत्यू झाला.

हा अपघात एवढा भयंकर होता की आजूबाजूच्या वस्तीतले देखील नागरिक रस्त्यावर धावत आले. लोकांना पाहून वेदांतने पळून जायचा प्रयत्न केला. मात्र त्याला नागरिकांनी भररस्त्यात अडवून धरलं आणि रस्त्यातच त्याला मारायला सुरुवात केली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;