भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, ‘उमेदवाराला मतदान करताना…’

भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, ‘उमेदवाराला मतदान करताना…’

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असल्यामुळे दिग्गज नेत्यांची प्राण प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. त्यामुळे मतदानासाठी आता सेलिब्रिटी देखील घराबाहेर पडत आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी सकाळी सात वाजता मदतान केलं. शिवाय इतरांनी देखील मतदान करावं असं आवाहन सेलिब्रिटी करताना दिसत आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला, ‘माझा भारत विकसित आणि मजबूत राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. हीच एक गोष्ट लक्षात ठेवून मी मतदान केलं आहे. अशाच प्रमाणे पूर्ण भारताने मदतानाचा हक्क बजावला पाहिजे. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटत आहे, त्या उमेदवाराला मतदान करा. यावेळी मोठ्याप्रमाणे लोकं मतदानासाठी घराबाहेर निघतील. मी सकाळी सात वाजता मतदान केलं आहे. मी मतदान केंद्रावर पोहोचलो तेव्हा जवळपास 500 लोकं होती.’

 

 

भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार याने पहिल्यांदा मतदान केलं आहे. यावर देखील अभिनेत्याने भावना व्यक्त केल्या आहेत. मला आनंद होत आहे… असं अक्षय कुमार म्हणाला. आज मुंबईत देखील मतदान होत असल्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर सेलिब्रिटी दिसतील. आता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांना मतदान केंद्राबाहेर स्पॉट करण्यात आलं…

मुंबईत मतदान असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी मतदाना हक्क बजावण्यासाठी बाहेर पडती. अभिनेता फरहान अख्तर, अनिल अंबानी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;