शेवटच्या टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; मुंबईतील 6 जागांवर आज मतदान, 124 संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त

शेवटच्या टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; मुंबईतील 6 जागांवर आज मतदान, 124 संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मुंबईतील 6 जागांसह राज्यात एकूण 13 जागांवर मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून राज्यभरातील एपूण 24 हजार 579 मतदान केंद्रांपैकी मुंबईतील 9 हजार 904 केंद्रांवर मतदान होणार आहे. मुंबईत 124 संवेदनशील केंद्रे असून तिथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यभरातील 264 उमेदवारांचे भविष्य उद्या ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

लोकशाहीच्या सर्वात मोठय़ा उत्सवानिमित्त मुंबईत आज दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर मध्य, उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबई मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था केली असून केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आज नियुक्तीच्या ठिकाणी जाऊन कार्यभार स्वीकारला. मतदारांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला.

मुंबईत होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानाकरिता मुंबईतील सर्व मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. धारावीतील मतदान केंद्रांवर रविवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी कामाचा आढावा घेतला.

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅटद्वारे मतदान केले जाणार आहे. रविवारी निवडणूक कर्मचाऱ्यांनी ही सर्व सामग्री पोलिंग बूथवर पोलीस संरक्षणात नेली.

50 हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 50 हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात मुंबई पोलिसांचे 25 हजार कर्मचारी, त्यासोबत केंद्रीय सुरक्षा (सीएपीएफ-एसएपी) दलाच्या 36 तुकडय़ा, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक आणि 6 हजार 200 होमगार्ड पोलिसांच्या मदतीला असणार आहेत. मुंबई पोलीस दलातील 5 अतिरिक्त आयुक्त, 25 उपायुक्त, 77 सहाय्यक आयुक्त, 2 हजार 755 अधिकारी, 2 हजार 2100 पोलीस अंमलदार, आणि दंगल नियंत्रण पथक तैनात आहेत. मुंबई पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त 170 पोलीस अधिकारी, 5 हजार 260 पोलीस अंमलदार देण्यात आले आहेत. दरम्यान, 20 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बहुतांश ठिकाणी मुंबई पोलिसांनी रूट मार्च काढला.

मुंबईत सर्वाधिक संवेदनशील केंद्रे, 32 उत्तर-पूर्वमध्ये

राज्यभरातील 160 संवेदनशील मतदान केंद्रांवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या मतदान केंद्रांवर पोलिसांची अतिरिक्त पुमक ठेवण्यात आली आहे. राज्याच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक म्हणजे 124 संवदेनशील केंद्रे आहेत. यात उत्तर-पूर्व मतदारसंघात सर्वाधिक 32 संवेदनशील केंद्रे आहेत. उत्तर मुंबईत 30, उत्तर पश्चिममध्ये 21, उत्तर मध्य 30, दक्षिण मध्य मुंबईत 0 तर दक्षिण मुंबईत 11 केंद्रे संवेदनशील आहेत. या ठिकाणी पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उत्तर मुंबईत सर्वाधिक मतदार 

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी उत्तर मुंबईत सर्वाधिक मतदार आहेत, तर दक्षिण मध्य मतदारसंघात सर्वात कमी मतदार आहेत. उत्तर मुंबईत 18 लाख 11 हजार 942 मतदार आहेत, तर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात एपूण 14 लाख 74 हजार 405 मतदार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात 17 लाख 35 हजार 88 मतदार आहेत. उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात 16 लाख 36 हजार 890, तर उत्तर मध्य मतदारसंघात 17 लाख 44 हजार 128 मतदार आहेत.

कर्मचाऱ्यांना मतदानासाठी कामात सूट

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. जे कर्मचारी सकाळी येतात त्यांना दुपारच्या वेळेत मतदानासाठी सुट्टी, तर जे लोक दुपारच्या वेळेत येतात त्यांना सकाळी मतदान करून अर्ध्या दिवसाने कामावर रुजू होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आतापर्यंत 8 हजार 88 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

मुंबईत पोलिसांनी काही दिवसांपासून एक विशेष पथक स्थापन केले आहे. पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आला आहे. विशेष पथकातील कर्मचारी हे पॅमऱेयाच्या माध्यमातून चित्रीकरण करतात. लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 8 हजार 88 जणांविरोधात प्रतिबंधक कारवाई केली आहे.

मुंबईत सोमवारी होत असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जागोजागी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि निवडणूक कर्मचारी असलेले भरारी पथक वाहनांची कसून तपासणी करत आहेत.

मुंबई पालिकेचे 70 हजार कर्मचारी तैनात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेचे सुमारे 70 हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी तैनात करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. दरम्यान, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग, मुंबई महापालिका, हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि क्रिकेटपटूंनी आवाहन केले आहे.

मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

मुंबईत मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान पेंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान पेंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांना मतदान केंद्रापासून 100 मीटर बाहेर मोबाईल ठेवून मतदान करण्यासाठी जावे लागेल, असे यादव यांनी सांगितले.

मुंबईत 373 एनआरआय मतदार 

मुंबईत 373 अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदार आहेत. या मतदारांचे नाव मतदार यादीत असल्याने त्यांना मूळ पासपोर्ट असेल तर मतदान करता येईल. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक आहे.

पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी रात्री ऑपरेशन ऑल आऊट हाती घेतले. पोलिसांनी या ऑपरेशनदरम्यान 212 आरोपींवर आणि रेकॉर्डवरील सात आरोपींवर कारवाई केल्याची नोंद आहे.

राज्यातील अखेरच्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी शहरात काही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट हाती घेतले. वरिष्ठ पोलीस अधिकारी हे नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान विविध ठिकाणी भेटी देऊन मार्गदर्शन करत होते. पोलिसांनी 205 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले होते. त्या दरम्यान पोलिसांनी रेका@र्डवरचे 1 हजार 95 आरोपी तपासले. विविध गुह्यांत 212 आणि सात फरार आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. 17 जणांवर अजामीनपात्र वॉरंट बजावून त्यांच्यावर कारवाई केल्याची नोंद आहे. तर एनडीपीएस कायद्यानुसार 46, अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 31 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून चापू, तलवारीसारखी घातक शस्त्रs पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी रात्री 1 हजार 605 ठिकाणी नाकाबंदी लावली होती. त्यात 1 हजार 558 चालकांविरोधात विविध कलमांतर्गत कारवाई केली. तर एकावर दारू पिऊन वाहन चालविल्याने गुन्हा दाखल केल्याची नोंद आहे. पोलिसांनी या ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान 539 संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon : यंदा मरीन ड्राईव्हवर पावसाची मजा घ्यायला जाण्याचा प्लान करताय तर सावधान… Monsoon : यंदा मरीन ड्राईव्हवर पावसाची मजा घ्यायला जाण्याचा प्लान करताय तर सावधान…
यावेळी मान्सूनची जरा जास्तच वाट पाहीली जात आहे. दरवर्षी आपल्याला यंदाचा उन्हाळा जरा जास्तच कडक होता असं जरी वाटत असलं,...
मुंबई लोकलमध्ये डान्स, व्यावसायिक डान्सरचे ते नृत्य पाहून नेटकरी भडकले
चालत्या गाडीवर उभा राहून स्टंट, काही लाइक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ
कचाकचा भांडल्यानंतर रवीनाची बुजुर्ग महिलांना मारहाण?; पोलिसांच्या स्टेटमेंटनं आला नवा ट्विस्ट
आई झाल्यानंतर वाढले वजन, ग्लॅमरसपासून दूर, स्वरा भास्कर थेट म्हणाली, मी आता..
हेमा मालिनीसोबतच्या लग्नानंतरही 27 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात धर्मेंद्र, फक्त लग्नच..
‘बिग बॉस मराठी 5’ का सोडला? महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण