देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठा कट; मोहित कंबोज यांचे महाविकास आघाडीकडे बोट

देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठा कट; मोहित कंबोज यांचे महाविकास आघाडीकडे बोट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरिोधात मोठ कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. संशयाची सुई अर्थातच महाविकास आघाडीकडे आहे. त्यांनी या कटाविषयी, तो कोणी रचला, त्यामागील कारण काय याचा खुलासा अद्याप केलेला नाही. ते लवकरच यासंबंधीची सविस्तर माहिती देणार आहे. पण त्यांनी काही जणांच्या पदाचा उल्लेख केला. काही पक्षांचा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे नाव न घेता उल्लेख केल्याने एकच खळबळ माजली आहे. कंबोज लवकरच याविषयीचा गौप्यस्फोट करणार आहेत.

आरोपांची राळ

राज्यात लोकसभा निवडणूक 2024 चे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. महाविकास आघाडीविरोधात महायुतीत थेट टक्कर आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोज झडत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात तळ ठोकून होते. त्यांनी घेतलेल्या सभेत शरद पवार आणि महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला. भटकती आत्मा, भुताटकी, कुटुंबापर्यंत आरोपांची राळ उठली. त्याला महाविकास आघाडीतून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसूख घेतले. पण कंबोज यांच्या आरोपानंतर आता या विरोधाला वेगळे वळण लागल्याचे चित्र राज्यात दिसत आहे.

काय म्हणाले कंबोज

भाजप नेते मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर (आताचे एक्स) हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी गटाकडे कंबोज यांचा रोख आहे. या सर्व प्रकरणाचा आणि कटाचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा दावा त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण हे नव्या वळणावर येऊन ठेपल्याची चर्चा रंगली आहे.

कटात कोण-कोण

कंबोज यांनी कट रचल्याचे ट्विट केले आहे. हे ट्विट अवघ्या काही तासातच व्हायरल झाले आहे. या कटात कोण-कोण सहभागी आहेत, याची माहिती कंबोज यांनी दिली आहे. पण त्यांना यामध्ये कोणाची नावे घेतलेली नाही. त्यांनी काहींच्या पदाचा उल्लेख केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि एका आमदाराचा या कटात समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. तर या षडयंत्रात एका माजी पत्रकाराचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लवकरच याविषयीचा खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण ह खुलासा कधी करणार आणि या कटात कोण कोण सहभागी आहे, त्यांची नावे कंबोज यांनी दिलेले नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;