निवडणुकीत ड्रग्ज, दारू आणि धो धो पैसा; 9 हजार कोटींचा ऐवज जप्त, गुजरात पहिल्या क्रमांकावर
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून देशात पैसा, दारू, ड्रग्ज, मौल्यवान वस्तूंची अक्षरशः लयलूट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत तब्बल 9 हजार कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली असून यात सर्वाधिक 1,462 कोटींची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून ताब्यात घेण्यात आली आहे. यात 1,187.80 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा समावेश आहे. एकीकडे 400 पारचा नारा देणाऱ्या मोदींना यावेळी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आणि विजयाची खात्री नसल्यामुळेच अशा प्रकारे वाममार्गाचा अवलंब उमेदवारांना जिंपून आणण्यासाठी करण्यात येत असल्याची टीका आता देशभरातील विविध कारवायांवरून आणि जप्त केलेल्या मुद्देमालामुळे सर्व स्तरांतून होत आहे.
गुजरातनंतर राजस्थानात सर्वाधिक जप्ती करण्यात आली असून 765 कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याचे उघड झाले आहे. गुजरात एटीएस, नाकाxटिक्स पंट्रोल ब्युरो आणि भारतीय तटरक्षक दलाने संयुक्तपणे मोहीम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाया केल्या. यावेळच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान जप्त करण्यात आलेली रोकड ही 2019 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अडीच पट अधिक आहेत. लोकसभा निवडणुकांचे दोन टप्पे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हस्तगत करण्यात आलेला पैसा आणि ड्रग्जचा वापर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या 8,889 कोटी रुपयांच्या जप्तीपैकी सर्वात मोठा वाटा 45 टक्के ड्रग्जचा होता. सुमारे 3,959 कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले तर फ्रीबीजचा वाटा सुमारे 23 टक्के असून मौल्यवान वस्तूंचा वाटा 14 टक्के इतका आहे.
ड्रग्ज, मद्य, मौल्यवान धातू, मोफत वस्तू आणि रोख रक्कम वेगवेगळय़ा प्रमाणात निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरण्यात आली.
17 एप्रिल रोजी नोएडा पोलिसांनी ग्रेटर नोएडातील एका ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केला.
दारूची बेकायदेशीर वाहतूक करण्यात कर्नाटक अव्वल स्थानावर आहे. सुमारे 1.5 कोटी लिटर दारू जप्त करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रात 62 लिटर दारू हस्तगत करण्यात आली.
3 हजार 959 कोटींचे ड्रग्ज पकडले
सुमारे 3 हजार 959 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्ज, मद्य, मौल्यवान धातू, मोफत वस्तू आणि रोख रक्कम वेगवेगळय़ा प्रमाणात निवडणुकांवर प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने वापरण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने अमली पदार्थ जप्त करण्यावर भर दिला आहे. अवघ्या तीन दिवसांत 892 कोटी रुपयांची औषधेही जप्त करण्यात आली आहेत. गुजरात दहशतवाद विरोधी पथक, नाकाxटिक्स पंट्रोल ब्युरो आणि भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत मोठय़ा प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List