सांगली रेल्वेस्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ताब्यात, फलटणच्या तरुणाला मुंबईतून केली अटक

सांगली रेल्वेस्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ताब्यात, फलटणच्या तरुणाला मुंबईतून केली अटक

सांगली येथील रेल्वेस्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱया सचिन मारुती शिंदे उर्फ माधव किसन भिसे (वय 35, रा. तरटगाव, ता. फलटण, जि. सातारा. मूळ रा. गोपेवाडी, ता. पुसद, जि. यवतमाळ) याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर त्याला ताब्यात घेतले. संशयित हा कौटुंबिक त्रासाने वैफल्यग्रस्त असून, या त्रासातूनच कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सचिन शिंदे उर्फ माधव भिसे याने दि. 13 मे रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून पाकिस्तानातून रियाज कसाब बोलतोय. सांगलीत आलो असून, रेल्वेस्थानक बॉम्बने उडवणार असल्याची धमकी दिली. या धमकीच्या फोननंतर पोलीसदल खडबडून जागे झाले. सांगली व मिरज रेल्वे स्थानकावर बॉम्बशोधक पथकासह पोलीस धावले. उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली. अखेर खोडसाळपणाने हा फोन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तथाकथित रियाज कसाब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी धमकीचा फोन करणाऱया आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी स्वतंत्र तपास पथक बनवून शोधासाठी रवाना केले.

पोलीस उपनिरीक्षक विक्रम चव्हाण व पथकाने पुणे व मुंबई येथे तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. गुन्हे शाखा लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सचिन शिंदे उर्फ माधव भिसे याला मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने सांगली, पुणे, नागपूर व मुंबई येथे पोलिसांना फोन करून दहशतवादी बोलतोय असे सांगून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी दिल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध चोरीसारखे गुन्हे दाखल असून, तो कारागृहातदेखील जाऊन आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;