बड्या बिल्डरच्या मुलाच्या पॉश कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

बड्या बिल्डरच्या मुलाच्या पॉश कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

शहरातील कल्याणीनगर भागात बडय़ा बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगातील पोर्शे कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कल्याणीनगर जंक्शन चौकात हा थरार घडला. अपघातानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या कारचालकाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिस अवधिया व अश्विनी कोस्टा (रा. पुणे, मूळ- राजस्थान) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकिब रमजान मुल्ला (24, रा. चंदननगर, मूळ- सोलापूर) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारचालक 17 वर्षीय 8 महिने वयाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंद केला असून, त्याला ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा नोंद केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;