राज्यातून भाजप, मित्रमंडळींचा सुपडा साफ होणार! – नाना पटोले
यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष आणि मित्रमंडळींचा सुपडा साफ होणार असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात सभा घेतल्या, रोड शो केले तरीही त्यांना पुठेही प्रभाव पाडता आला नाही. खोटे बोलून त्यांनी दुष्प्रचार केला. मात्र जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असे पटोले म्हणाले. रोड शोच्या नावाने नरेंद्र मोदी यांनी मुंबईला वेठीस धरण्याचा काम केले. त्यांना रोड शोसाठी गुजरातवरून आणि बाहेरून लोक आणावे लागले, अशी टीकाही पटोले यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List