गॅस रिफिलिंग करताना कंटेनरचा भीषण स्फोट 4 कंटेनर जळून खाक; 15 घरांचे नुकसान
गॅस कंटेनरमधून अवैधरीत्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये गॅस काढताना झालेल्या गळतीमुळे आग लागून कंटेनरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना चाकण-शिक्रापूर महामार्गावर मोहितेवाडीत रविवारी (दि. 19) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. हा स्फोट एवढा भयानक होता की, टँकरवरील गॅस टाकी आकाशात उंच उडून खाली पडली. या स्फोटामुळे 4 कंटेनर जळून खाक झाले असून, परिसरातील 15 घरांचे आणि एका धाब्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक नागू गांगड (वय 57) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कंटेनरला पार्किंगसाठी जागा देणाऱ्या हॉटेलचे चालक चैतन्य गणपत मोहिते (वय 50, रा. मोहितेवाडी), सुदर्शन कान्होरकर (रा. दावडी, ता. खेड) या दोघांना अटक केली असून, सुरेश रूपाणी (रा. राजस्थान), चालक मुस्ताक कमलुद्दीन, सोमनाथ पोतले आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List