Lok sabha election 2024 voting update : महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदान

Lok sabha election 2024 voting update : महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मुंबईतील 6 जागांसह राज्यात एकूण 13 जागांवर आणि देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.

  • महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदान
  • धुळे- 6.92 टक्के, दिंडोरी- 6.40 टक्के, नाशिक – 6.45 टक्के, पालघर- 7.95 टक्के, भिवंडी- 4.86 टक्के, कल्याण – 5.39 टक्के, ठाणे – 5.67 टक्के, मुंबई उत्तर – 6.19 टक्के, मुंबई उत्तर प. – 6.87 टक्के, मुंबई उत्तर पूर्व – 6.83 टक्के, मुंबई उत्तर मध्य – 6.01 टक्के, मुंबई दक्षिण मध्य- 7.79 टक्के, मुंबई दक्षिण – 5.34 टक्के मतदान
  • भिवंडी लोकसभा मतदारसंघातील व कल्याण तालुक्यातील रायते विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रायते या मतदार केद्रात रूम नंबर 3 मधील मशीन सकाळी 7 वाजता बंद पडले. तब्बल दीड तास झाला तरी मशीन चालू झाली नाही. या मुळे मतदारांमध्ये नाराजी पसरली असून आम्हाला जेवढे तास बंद पडले आहे तेवढे तास मतदान करण्यास वेळ द्या अशी मागणी मतदारांनी केली आहे.
  • बदलापूरमध्ये 52 मिनिटं उशिरा सुरु झाले मशीन; मतदार केंद्र बंद, पहिल्या मतदाराने 7 वाजून 52 मिनिटांनी केलं मतदान
  • शिवसेना उमेदवार भारती कामडी यांनी सहकुटुंब मतदान केले

  • शिवसेना उमेदवार वैशाली दरेकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

  • अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने केले मतदान

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. हा अभिमानाचा क्षण असून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी केले.

  • अभिनेता राजकुमार राव याने बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता राजकुमार राव याने बजावला मतदानाचा हक्क

  • अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह यांनी वर्सोवा येथे बजावला मतदानाचा हक्क

  • ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी जुहूतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

  • अभिनेत्री जान्हवी कपूर हिने केले मतदान

  • 100 टक्के विजयाची हॅटट्रीक करणार, शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

  • अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक झोया अख्तर यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • अभिनेता अक्षय कुमार याने रांगेत उभे राहून केले मतदान

  • उद्योजक अनिल अंबानी यांनी बजावला मतदानाचा हक्का

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;