लिफ्टच्या डकमध्ये पडून कामगाराचा मृत्यू 

लिफ्टच्या डकमध्ये पडून कामगाराचा मृत्यू 

 

बोरिवली येथील बांधकामाधीन इमारतीच्या लिफ्टच्या डकमध्ये पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे. बाभसिंधू असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी पंत्राटदार आणि साईट इंजिनीअरविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

बोरिवलीच्या न्यू एमएचबी का@लनी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे बाभसिंधू हा महिनाभरापासून काम करत होता. शनिवारी सकाळी बाभसिंधू हा इतर कामगारांसोबत बाराव्या मजल्यावर गेला. तेथे तो स्लॅबच्या सळीचे फिटिंगचे काम करत होता. दुपारी जेवणाची वेळ झाल्यावर त्याने हेल्मेट आणि सुरक्षा बेल्ट काढून ठेवले.  बाराव्या मजल्यावरून खाली येत असताना उघडय़ा लिफ्टच्या डकच्या बाजूला पाय घसरून तो खाली पडला. बाराव्या मजल्यावरून तो खाली पडल्याने जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच बोरिवली पोलीस घटनास्थळी गेले. बाभसिंधूच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पंत्राटदार आणि साईट इंजिनीअरविरोधात गुन्हा दाखल केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;