Ajit Pawar : मतदानासोबत मुलाचं कर्तव्य, पहा अजित पवारांचे मतदान केंद्रावरचे खास Photos
आज देशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. 11 राज्यातील लोकसभेच्या एकूण 93 जागांवर मतदान होतय. महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होतय. यात बारामती लोकसभेची निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची आहे.
अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर पत्नी सुनेत्रा पवार आणि आईसोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी ते आईला सोबत घेऊन आले होते.
बारामतीमध्ये यंदा चुरशीची निवडणूक आहे. पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. काका-पुतण्यामधील ही लढाई आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहे. महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंना उमेदवारी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List