75 वर्षीय आजोबांना हायकोर्टाचा दिलासा; तीन मुलांना झोपड्यातून आठ आठवड्यात बाहेर जाण्याचे आदेश

75 वर्षीय आजोबांना हायकोर्टाचा दिलासा; तीन मुलांना झोपड्यातून आठ आठवड्यात बाहेर जाण्याचे आदेश

सांताक्रुझ येथील 75 वर्षीय आजोबांच्या झोपडय़ातून त्यांच्या तीनही मुलांनी बाहेर पडावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. दोन मुलांनी घर रिकामे केले असून एक मुलगा झोपडय़ातून बाहेर पडत नव्हता. न्यायालयाच्या आदेशामुळे त्यालाही घराबाहेर पडावे लागेल. घर रिकामे करण्यासाठी न्यायालयाने आठ आठवड्यांची मुदत दिली आहे.

गोविंद बावकर असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलीचा विवाह झाला आहे. तिला एक मुलगा आहे. या सर्वांना घरातून बाहेर काढण्यासाठी बावकर यांनी ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाकडे अर्ज केला. हा अर्ज प्रलंबित असताना मुलगी घरातून बाहेर पडली. एक मुलगा स्वतंत्र राहत होता. दुसरा मुलगा घर रिकामी करत नव्हता.

हे प्रकरण दिवाणी वादाचे आहे, असे स्पष्ट करत प्राधिकरणाने ज्येष्ठ नागरिकाचा अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात बावकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. गौरी गोडसे यांच्या एकल पीठाने याचिका मंजूर केली.

काय आहे प्रकरण
बावकर हे महापालिकेचे निवृत्त कर्मचारी आहेत. मुलगी व तिचे कुटुंब, अन्य दोन मुलांचे कुटुंब एकत्रितपणे सांताक्रुझ येथील झोपडय़ात राहत होते. बावकर यांचे सुनेसोबत अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करण्यात आला. याचा त्यांना मानसिक त्रास झाला. त्यांनी एकटे राहण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू होती.

मुलाचा दावा
मी माझ्या कुटुंबासोबत मूळ घरात राहतो तर वडील वरच्या मजल्यावर राहतात. माझा त्यांना काहीच त्रास नाही. ज्येष्ठ नागरिक कायद्याचा गैरफायदा घेऊन ते मला घरातून बाहेर काढत आहेत. वडिलांचा अर्ज फेटाळण्याचा प्राधिकरणाचा निर्णय योग्यच आहे, असा दावा मुलाने केला होता. न्यायालयाने तो मान्य केला नाही.

– बावकर यांचे हित जपण्यात प्राधिकरण अपयशी ठरले आहे. झोपडे ज्येष्ठ नागरिकाचे आहे यात काहीही दुमत नाही. मुलाला घराबाहेर काढले तर त्याचे नुकसान होणार नाही, असे निरीक्षण न्यायालायने नोंदवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;