मराठा कुणबी कायदा, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यास समाजाला निवडणुकीत उतरवणार – मनोज जरांगे
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा हे एकच आहेत. त्यासंबंधीचा कायदा आणि सगेसोयऱयाची अंमलबजावणी न केल्यास समाजाला देणारे बनविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत उतरावावे लागेल, अशी खणखणीत भूमिका आज रविवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. मात्र आपण निवडणूक लढविणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील संवाद दौऱयानिमित्त राज्यभर दौरा करीत आहेत. मराठवाडय़ात दौरा सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, आज रविवारी त्यांनी मोजक्या पत्रकारांशी संवाद साधला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List