Sambhaji Raje : जातीच्या मुद्यावरुन पाडापाडीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? Video

Sambhaji Raje : जातीच्या मुद्यावरुन पाडापाडीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? Video

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईसह महाराष्ट्रात, देशात आज पाचव्या टप्प्याच मतदान होत आहे. या मतदानाआधी छत्रपती संभाजीराजे यांनी एक अत्यंत महत्त्वाच विधान केलय. एकाबाजूला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा आंदोलन सुरु करण्याच्या तयारीत ते आहेत. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यात भरघोस प्रतिसाद मिळाला होता. राज्यातील मराठा समाज भक्कमपणे त्यांच्या पाठिशी असल्याच चित्र दिसलं होतं. सध्या राज्यात लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येतील. त्यावेळी मनोज जरांगे पाटील आणखी आक्रमक भूमिका घेऊ शकतात.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी महत्त्वाच वक्तव्य केलय. ‘जातीचा मुद्दा करुन पाडापाडी करणं अत्यंत चुकीच आहे’, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. ‘गरीब मराठ्यांना न्याय मिळावा, यासाठी माझा लढा आहे’ असं ते म्हणाले. “अठरा पगड बार बलुतेदारांच राज्य आहे. आपल्या जातीवर आपलं प्रेम असणं यात काही चुकीच नाहीय. पण याला पाड हा या जीताचा, तो या जातीचा, मी स्वत: या मताचा नाही. मी शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे. सगळ्या बहुजन समाजातील लोकांना सोबत घेऊन जाणं माझी जबाबदारी आहे. माझा मराठ्यांसाठी लढा का आहे? गरीब मराठ्यांना न्याय मिळालेला नाही. जो इतर समाजाला मिळाला आहे” असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

महाराष्ट्रात किती जागांवर मतदान?

आज पाचव्या टप्प्यात देशातील 49 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रात मतदानाचा हा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यासह महाराष्ट्रात 48 जागांवर मतदान पूर्ण होईल. मुंबईसह राज्यात एकूण 13 जागांवर आज मतदान आहे. यात मुंबईतील लोकसभेचे सहा मतदारसंघ आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;