मतदान सुरु होण्यापूर्वीच अनिल अंबानी मतदानासाठी रांगेत, व्हिडिओ आला समोर
लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील सहा जागांवर २० मे रोजी मतदान सुरु झाले. मतदानासाठी सकाळापासून सर्वसामान्य मतदारांनी रांगा लागल्या. त्याच्याप्रमाणे बॉलीवूडमधील कलाकार, उद्योजक मतदानासाठी बाहेर पडले. राज्यातील सर्वत्र मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. मतदानास सकाळी सात वाजता सुरुवात होण्यापूर्वी मतदार रांगेत होते. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीसुद्धा मतदान सुरु होण्यापूर्वी रांगेत लागलेले दिसन येत आहे. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
अनिल अंबानी पाहत होते मतदान सुरु होण्याची वाट
देशात सर्वसामान्य व्यक्तीपासून बड्या व्यक्तीपर्यंत सर्वांना मतदानाचा समान अधिकारी आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिलायन्स अनिल धीरूभाई अंबाणी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानीसुद्धा सकाळीच बाहेर पडले. सकाळी ६.४५ च्या सुमारास मतदान सुरु होण्यापूर्वी ते रांगेत लागले होते. कुलाबा मतदान केंद्राबाहेर मतदान सुरु होण्याची ते वाट पाहत होते. कप परेडमध्ये राहणारे अनिल अंबानी रांगेत काही जणांशी संवाद साधत होते. त्या रांगेत त्यांचा आठ ते दहावा क्रमांक दिसत होता. मुंबईतील गर्मीचा त्रास त्यांना होत होता. अनिल अंबानी रांगेत उभे असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. २८ सेंकदाचा हा व्हिडिओ असून त्यात अनिल अंबानी मतदान केंद्राबाहेर वाट पाहताना दिसत आहे.
#WATCH | Industrialist Anil Ambani stands in a queue at a polling booth in Mumbai, as he waits for the voting to begin.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/UUCC9iOmyu
— ANI (@ANI) May 20, 2024
अक्षय कुमार लागला रांगेत
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार मतदानासाठी रांगेत लागला. अक्षय कुमारने जुहू येथे मतदान केले. मतदान करुन आल्यानंतर अक्षय कुमार याने सर्व जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी अक्षय कुमारने यंदा आतापर्यंतचे सर्वाधिक मतदानाचा विक्रम होणार असल्याचे सांगितले. दुसऱ्यांदा भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार पहिल्यांदा मतदानासाठी गेला होता.

उमेदवारांनी केले मतदान
उमेदवार आणि लोकप्रतिनिधी यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. यामिनी जावध यांनी सकाळीच मतदान केले. उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मतदान केले. राहुल शेवाळे यांनीही मतदान केले. उल्हासनगरमधील भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

काही ठिकाणी ईव्हीएम पडले बंद
डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय येथील मतदान केंद्रावरील एक ईव्हीएम मशीन बंद पडली. ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना इतर ठिकाणी घडल्या. निवडणूक कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बदलून मतदान सुरु केले. त्यामुळे काही ठिकाणी मतदानास उशीर झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List