असं झालं तर… शेजारी दररोज भांडत असेल तर…
शेजारी चांगला मिळावा असे प्रत्येकाला वाटते, परंतु बऱ्याचदा काही शेजारी भांडखोर स्वभावाचे असतात. क्षुल्लक कारणावरूनही ते रोज भांडण करतात.
जर तुम्हाचा शेजारीसुद्धा कोणत्याही कारणावरून भांडत असेल, तर शेजाऱ्याच्या भांडणाला प्रतिसाद देऊ नका. तो भांडतोय म्हणून तुम्हीही लगेच भांडू नका.
भांडण नेमके कशामुळे होते, याचे पुरावे जमा करा. व्हिडीओ रेकार्ंडग करून ठेवा. सोसायटी असेल तर सदस्यांना किंवा अध्यक्षांना या भांडणाची माहिती द्या.
जर शेजारी जास्तच भांडत असेल आणि तुम्हाला हा त्रास असह्य होत असेल तर सरळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा. त्याच्याविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करा.
पोलिसांनी यामध्ये कोणतीही कारवाई केली नाही, तर तुम्ही कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घ्या. यासाठी न्यायालयात रीतसर अर्ज दाखल करून न्यायाची मागणी करा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List