शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा, कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करणार – राजू शेट्टी
शक्तीपीठ महामार्गाच्या रुपात राज्य सरकारवर तब्बल 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज सर्वाधिक व्याज दराने घेणार आहे. त्यामुळे हा महामार्ग महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणार आहे. राज्य शासन अगोदरच कर्जबाजारी आहे, ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत म्हणून ते आत्महत्या करत आहेत, शासकीय कर्मचाऱ्यांचीही तीच अवस्था आहे, शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही. त्यामुळे हा महामार्ग राज्यावर कर्जाचा बोजा पाडणार आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचही राजू शेट्टी म्हणाले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या 8 पदरी रस्त्यासाठी प्रति किलोमीटर 70 कोटींचा खर्च येतो. मात्र शक्तीपीठ महामार्ग सहा पदरी असून त्याला 107 कोटी रुपये खर्च दाखवला आहे, म्हणजेच यामध्ये मोठा घोटाळा असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून सनन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. हा महामार्ग सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना महापुराच्या संकटात ढकलणारा आहे. नैसर्गिक दृष्ट्या संवेदनशील असलेलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18 किमीचे दोन बोगदे काढले जाणार आहेत. यामधून बॉक्साइटचे उत्खनन करण्याचा सरकारचा डाव आहे, त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही या महामार्गाला विरोध आहे.
वर्धा ते कोल्हापूर आणि नागपूर ते रत्नागिरी या महामार्गाला समांतर असा हा शक्तीपीठ महामार्ग असून तो महामार्ग तोट्यात आहे. त्या मार्गावर वाहतूक कमी आहे. त्यामुळे नवीन महामार्ग कशाला? तरीही रस्ता वाढवायचा आहे तर तो आठ पदरी करावा, अशी मागणी आहे. 2022 साली भूसंपादन कायद्यात बदल केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. सहा पट भरपाई मिळण्याचे कारण सांगून फसवणूक होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List