सोलापुरात आरक्षणासाठी बंजारा समाजाचा मोर्चा
बंजारा समाजाला ‘एसटी’ प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोलापुरात बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात शहर व जिह्यातून हजारो बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते.
बंजारा समाजाला ‘हैदराबाद गॅझेट’च्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘एसटी’ प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी तीक्र आंदोलन सुरू झाले आहे. सोलापूर शहर व जिह्यातील हजारो बंजारा समाजबांधवांनी आज नेहरूनगर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे…’, ‘जय सेवालाल’च्या घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून गेला होता.
‘हैदराबाद गॅझेट’प्रमाणे बंजारा समाज एसटी प्रवर्गात येतो; परंतु महाराष्ट्रात एसटी प्रवर्गाची सवलत नसल्याने बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात आरक्षण मिळविण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर नेहरूनगर येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. बैलगाडीसह आंदोलक मोर्चात सहभागी झाले होते. पारंपरिक बंजारा वेशभूषेत महिला मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. ‘सरकारने बंजारा समाजाची मागणी तातडीने पूर्ण करावी; अन्यथा राज्यभर तीक्र आंदोलन छेडण्यात येईल,’ असा इशारा मोर्चाचे आयोजक सूरज चव्हाण यांनी दिला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List