ब्लॅकरॉक कंपनी भाड्यापोटी मोजणार 410 कोटी; बंगळुरूमध्ये ऑफिस थाटले, 21.75 कोटी सिक्युरिटी डिपॉझिट जमा
जगातील सर्वात मोठी एसेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉकने हिंदुस्थानात आपला व्यापार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने नुकतेच बंगळुरूमध्ये एक आलिशान ऑफिस भाडेतत्त्वावर घेतले आहे. हे ऑफिस 10 वर्षांसाठी भाड्याने घेतले असून यासाठी कंपनी तब्बल 410 कोटी रुपये मोजणार आहे. यासाठी कंपनीने 21.75 कोटी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा केले आहे.
ब्लॅकरॉकचे नवीन ऑफिस हे बंगळुरूच्या एमजी रोडवरील इंडिक्यूब सिम्फनी इमारतीत आहे. हे हायप्रोफाईल ऑफिस असून 1.43 लाख वर्ग फूट इतके मोठे आहे. यात ग्राऊंड प्लस पाच म्हणजेच एकूण सहा मजले आहेत. कंपनी यासाठी दर महिन्याला 2.72 कोटी रुपये भाडे देणार आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून हे कार्यालय सुरू होणार आहे. हे 10 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आले असून भाडेतत्त्वानुसार दरवर्षी भाड्यात 5 टक्के वाढ केली जाईल. ब्लॅकरॉक कंपनीने याआधी मुंबईतील वरळी भागात प्रीमियम ऑफिस भाड्याने घेतले आहे. एका कमर्शियल बिल्डिंगमध्ये 42,700 वर्गफीट ऑफिस पाच वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List