महत्त्वाचे – येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण
येत्या रविवारी संपूर्ण हिंदुस्थानातून खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे, अशी माहिती पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी ग्रहणास सुरुवात होईल. त्यानंतर रात्री 11 ते 12 वाजून 23 मिनिटांपर्यंत चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत येईल. त्यामुळे खग्रास स्थिती निर्माण होईल. यावेळी पौर्णिमेचा चंद्र लालसर किंवा तपकिरी रंगाचा दिसेल. रात्री 12 वाजून 23 मिनिटांनी ग्रहण सुटण्यास सुरुवात होईल. त्यानंतर 1 वाजून 27 मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे संपेल.
एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये प्रशिक्षणार्थींची भरती
भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये 192 अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर ही आहे. इच्छुक उमेदवारांना nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे.
बेस्ट बस चालकाला मारहाण; तिघे अटकेत
बेस्ट बस चालकाने बस मागे न घेतल्याने एका रिक्षा चालकाने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने बेस्ट बस चालकाला बेदम मारहाण केली. याबाबत कांजूरमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. बाळासाहेब शिंदे जखमी बेस्ट बस चालकाचे नाव असून ते कांजूरमार्ग बेस्ट डेपो येथे हंगामी वाहक म्हणून कार्यरत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List