पाकिस्तानातील पूर हा अल्लाहचा आशीर्वाद! बादल्या भरून ठेवा!! संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे अजब विधान

पाकिस्तानातील पूर हा अल्लाहचा आशीर्वाद! बादल्या भरून ठेवा!! संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे अजब विधान

पाकिस्तान सध्या पुराच्या पाण्याने बेजार आहे. हिंदुस्थानातील विविध नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून या नद्यांतील पाण्याच्या विसर्गामुळे पाकिस्तानात हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. पाकिस्तानातील संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुराच्या पाण्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. ‘पाकिस्तानात आलेला पूर म्हणजे अल्लाहचा आशीर्वाद आहे, घरापर्यंत पाणी आले असेल तर पाण्याने बादल्या भरून ठेवा,’ असे विधान ख्वाजा आसिफ यांनी केले आहे. त्यांच्या या विधानांची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे.

ख्वाजा आसिफ यांना पत्रकाराने पाकिस्तानातील पुराबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तानी लोकांनी या पुराच्या पाण्याला अल्लाहचा आशीर्वाद मानावा. पुराच्या पाण्याला बादल्यामध्ये भरून ठेवावे. ते म्हणाले की, संपूर्ण जगात पाण्याच्या अडचणीमुळे हाहाकार उडाला आहे. त्यामुळे पाकिस्तानात जर पुराचे पाणी आले असेल तर ते अल्लाहचा आशीर्वाद आहे. पुराचे पाणी हे संकट नाही तर अल्लाहचा आशीर्वाद आहे, असे ते म्हणाले.

पाणी जमा करा!

पुराचे पाणी आणि मुसळधार पावसामुळे लोक रस्त्यांवर उतरून सरकार आणि प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहेत. रस्ते जाम करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. यावर ख्वाजा म्हणाले की, लोकांनी आधी पाणी जमा करण्यावर लक्ष द्यायला हवे. पाणी घरी भरून ठेवायला हवे. यामुळे सर्व समस्या कमी होतील. पाणी जमा करण्यासाठी मोठ्या बंधाऱ्यांची गरज आहे. परंतु, सध्या ते शक्य नाही. त्यामुळे लोकांनी घरातच पाणी साचून ठेवावे. पुराला रोखण्यासाठी सरकारकडे सध्या कोणतीही सिस्टम नाही. लोक विनाकारण सरकारला दोष देत आहेत, असेही ते म्हणाले.

पुरामुळे 854 लोकांचा मृत्यू

26 जून ते 31 ऑगस्टपर्यंत पाकिस्तानात पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 854 झाली आहे. 1100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पुरामुळे पंजाब प्रांतात जवळपास 20 लाख लोकांना याचा फटका बसला आहे. झेलम, चिनाब आणि रावी नद्यांनी पाण्याची धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंजाब प्रांतात 10 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे...
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?
जगभरात टॅरिफ बॉम्ब फोडणाऱ्या ट्रम्प यांना झटका; अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा Moody’s चा दावा
जम्मू कश्मिरमध्ये पावसाचे थैमान, रेल्वेच्या 30 सप्टेंबरपर्यंत 68 गाड्या रद्द
सरकारनं दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग होणार नाही; नवीन काहीही मिळालेलं नाही! – मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील
हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 1337 मार्ग ठप्प