उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीवर ‘लक्ष्मी प्रसन्न, एकाच दिवशी 5 कोटी 19 लाख 51 हजारांची करवसुली

उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीवर ‘लक्ष्मी प्रसन्न, एकाच दिवशी 5 कोटी 19 लाख 51 हजारांची करवसुली

उल्हासनगर महापालिकेने राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने राबवलेल्या विशेष मालमत्ता कर भरणा योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात थकबाकीदारांना चालू मागणीसह एकरकमी संपूर्ण थकबाकी भरल्यास 100 टक्के विलंब शुल्क माफी देण्याची सुविधा देण्यात आली होती. या संधीचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत एकाच दिवसात विक्रमी 5 कोटी 19 लाख 51 हजार 321 रुपयांची भर पडली.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने 13 सप्टेंबर रोजी पालिकेत एक दिवसीय मालमत्ता कर भरणा योजना राबवण्यात आली होती. या योजनेत नागरिकांनी चालू मागणीसह एकरकमी संपूर्ण थकबाकी भरल्यास 100 टक्के विलंब शुल्क माफी देण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे एकाच दिवशी विक्रमी 5 कोटी 19 लाख 51 हजार 321 रुपये इतकी करवसुली झाली.

धनदांडग्यामुळे थकबाकी वाढली

उल्हासनगर महापालिकेने थकीत मालमत्ता करवसुलीसाठी फेब्रुवारी महिन्यात अभय योजना लागू केली होती. पालिका प्रशासन मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांना सवलत देत असले तरी नागरिकांकडून वेळेत भरणा केला जात नसल्याची बाब समोर आली. त्यातही सर्वसामान्य नागरिक त्यांचा कर नियमितपणे भरत असला तरी मोठे धनदांडगे थकबाकीधारक कर थकवतात. त्यांच्याकडे मालमत्ता कराचा थकीत आकडा कोटींच्या घरात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

24 तासांच्या आत आरोपीला शोधून काढा, राज ठाकरे यांची पोलिसांना सूचना 24 तासांच्या आत आरोपीला शोधून काढा, राज ठाकरे यांची पोलिसांना सूचना
शिवतीर्थावरील सौ. मीनाताई ठाकरे (माँसाहेब) यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकून खोडसाळपणा केला. या घटनेचा शिवसैनिकांनी निषेध केला. आता...
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा खोडसाळ प्रयत्न, शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट
राजापुरात तीन बिबट्यांचा दुचाकीस्वारावर हल्ला; तरुण गंभीर जखमी
Paithan news – पंचनामा सुरू असताना अधिकाऱ्यांनी ‘तुझ्यावरच गुन्हा दाखल करू’ म्हणत झापलं, शेतकऱ्यानं विहिरीत उडी घेत जीवन संपवलं
सांगलीतील 9 हजारांवर शिक्षकांना धक्का, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आता ‘टीईटी’ची सक्ती; 52 वर्षांच्या आतील गुरुजींना द्यावी लागणार परीक्षा
कोल्हापूर महापालिका प्रभागरचनेवर 55 हरकती, 22 सप्टेंबरपर्यंत होणार सुनावणी
रसायनयुक्त बनावट देशी दारू बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कराड शहर पोलिसांची कारवाई; 11 लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक