प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना ‘केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची घोषणा
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ यंदा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते, ‘पद्मश्री’, ‘महाराष्ट्रभूषण’ अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आला आहे.
येत्या 4 ऑक्टोबर रोजी गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शाल-श्रीफळ, मानपत्र व 51 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार सोहळ्यानंतर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार असल्याचे अष्टेकर यांनी सांगितले. यावेळी नाटय़ परिषदेचे आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन, किरण कांबळे, शिवकुमार हिरेमठ, हेमसुवर्णा मिरजकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List