कांदा भजी जगभर व्हायरल

कांदा भजी जगभर व्हायरल

लंडनमध्ये नुकतेच हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. या स्थलांतरविरोधी मोर्चामधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलक प्रसिद्ध कांदा भजी विकत घेताना दिसत आहेत. या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. शनिवारी ‘युनाईट द किंगडम’ मोर्चादरम्यान हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला. टॉमी रॉबिन्सनने आयोजित केलेल्या या रॅलीत एक लाखाहून अधिक जण सहभागी झाले होते. आंदोलकांची गर्दी ही ‘आम्हाला आमचा देश परत हवा आहे’ अशा घोषणा देत साऊथ बँक सेंटर येथून वेस्टमिन्स्टरकडे जात होती. यादरम्यान एका आंदोलकाने एका फूड स्टॉलजवळ थांबून कांदा भजी विकत घेतली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. एक्स हँडल  @MikeTown44  ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;