कॉन्स्टसच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ त्रिशतकापार

कॉन्स्टसच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ त्रिशतकापार

ऑस्ट्रेलियन आक्रमक फलंदाज सॅम कॉन्स्टसच्या कारकीर्दीत अनेक चढ-उतार आले असले तरी त्याने पुन्हा एकदा झंझावाती खेळ केला. त्याने हिंदुस्थान ‘अ’ विरुद्धच्या पहिल्या बहुदिवसीय सामन्यात शतक ठोकत संघाला पहिल्या दिवसअखेर 5 बाद 337 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली. मेलबर्नमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराला धक्का देत अर्धशतक ठोकणारा हा खेळाडू नंतर वादाच्या भोवऱयात सापडला होता. मात्र आता त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली.

आज एकाना स्टेडियमवर पावसामुळे सामन्याला उशिरा सुरुवात झाली. ऑस्ट्रेलिया ‘अ’चा कर्णधार नॅथन मॅकस्वीनीने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. कॉन्स्टस आणि कॅम्पबेल केलावे यांनी आक्रमक फटकेबाजी करत हिंदुस्थान ‘अ’च्या प्रसिध कृष्णा, खलील अहमद, तनुष कोटियन यांच्यासारख्या गोलंदाजांना अडचणीत टाकले. केलावेने 53 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर कॉन्स्टने कोटियनला षटकार खेचत 122 चेंडूंवर आपले शतक झळकावले. चहापानावेळी ऑस्ट्रेलिया ‘अ’ने 37 षटकांत बिनबाद 198 अशी तडाखेबंद सुरुवात केली होती.

पावसामुळे पुन्हा खेळात खंड पडला. मात्र नंतर गुरनूर ब्रारने केलावेचा झेल पकडून संघाला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार मॅकस्वीनी (1) हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. दुबेनेच कॉन्स्टसला 109 धावांवर त्रिफळाचीत केले. खलील अहमदने ऑलिव्हर पीकला पायचीत करत हिंदुस्थान ‘अ’ला आणखी यश मिळवून दिले. हर्ष दुबेने 88 धावांत 3 विकेट मिळवले. शेवटच्या सत्रात कूपर कोनोली आणि लियाम स्कॉट यांनी पाचव्या विकेटसाठी 109 धावांची भागी करत संघाला 333 धावापर्यंत नेले. कोनोली 70 धावांवर बाद झाला. खेळ थांबला तेव्हा स्कॉट 47 तर जोश फिलीप 3 धावांवर खेळत होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डुप्लांटिसची पुन्हा कमाल; 14 व्यांदा मोडला पोल वॉल्टचा विश्वविक्रम डुप्लांटिसची पुन्हा कमाल; 14 व्यांदा मोडला पोल वॉल्टचा विश्वविक्रम
तो आला… तो झेपावला… त्याने विश्वविक्रम मोडला… अन त्याने जगज्जेतेपदाचीही हॅटट्रिक केली. टोकियोच्या नॅशनल स्टेडियममध्ये सोमवारी रात्री पन्नास हजारांहून अधिक...
कॉन्स्टसच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ त्रिशतकापार
फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर, मग भेटीगाठी अन् प्रेमकहाणीचा भयानक अंत; प्रकरण काय?
मोनोरेलची सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित, वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरडीएचा निर्णय
इस्रायलचा गाझावर हल्ला, ४१ जणांचा मृत्यू, ३ लाख लोकांनी शहर सोडले
Beed News – लाखो ठेवीदारांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारणार्‍या फरार अर्चना कुटे पुण्यात जेरबंद
डोपिंग टेस्ट प्रकरणी ICC ची मोठी कारवाई, नेदरलॅंडच्या खेळाडूवर तीन महिन्यांची बंदी