यूपीआय कंपनीकडे लायसन्स नसेल तर सेवा बंद
फोने पे, पेटीएम, झोमॅटो, अमेझॉन पे यासारख्या 32 प्रमुख पेमेंट ऑग्रिगेटर्ससाठी आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार आता या कंपन्यांना लायसन्स घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. लायसन्स नसेल तर कुठलीही कंपनी सेवा देऊ शकणार नाही. या नियमाचे उल्लंघन केल्यास कंपनीवर कडक कारवाई केली जाईल.
ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. 31 डिसेंबरपर्यंत लायसन्ससाठी अर्ज पाठवावे लागतील. याआधी ही डेडलाइन अनेक वेळा वाढवण्यात आली होती, मात्र आता अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. पेमेंट अॅग्रीगेटरने जर नियमांचे पालन केले नाही तर 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सेवा बंद केली जाईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List