मोनोरेलची सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित, वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरडीएचा निर्णय

मोनोरेलची सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित, वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरडीएचा निर्णय

वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडानंतर मोनोरेल प्रणाली अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी एमएमआरडीए महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. याच पार्श्वभूमीवर मोनोरेलची सेवा तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा एमएमआरडीएने मंगळवारी केली आहे. त्यानुसार शनिवार 20 सप्टेंबरपासून मोनोरेलची सेवा स्थगित करण्यात येणार आहे.

या नियोजित ब्लॉकमुळे नवीन रोलिंग स्टॉकचे जलद एकत्रीकरण, प्रगत CBTC सिग्नल यंत्रणा बसवणे आणि सध्याच्या रेक्सचे नूतनीकरण अधिक वेगाने करता येणार आहे. यामुळे मुंबईकरांना सुरक्षित, सुरळीत आणि अधिक विश्वासार्ह सेवा मिळेल.

मोनोरेलला पुनरुज्जीवित करण्यासाठी हा महत्वाचा टप्पा आहे. नवीन रेक्स समाविष्ट करून, प्रगत CBTC सिग्नल यंत्रणा आणि सध्याच्या रेक्सचे नूतनीकरण यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, विश्वासार्ह सेवा मिळेल, असा विश्वास एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, आयएएस डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;