केंद्रचालकांच्या संतापानंतर सरकारला आली जाग, शिवभोजन थाळीचे थकवलेले दोनशे कोटी रुपये देणार

केंद्रचालकांच्या संतापानंतर सरकारला आली जाग, शिवभोजन थाळीचे थकवलेले दोनशे कोटी रुपये देणार

महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात गोरगरीबांना आधार देण्यासाठी शिवभोजन योजना सुरू केली, पण महायुती सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने केंद्र चालकांचे पैसे सरकारने थकवले. संतप्त केंद्र चालकांनी आंदोलन करून सरकारचा निषेध केला होता, पण आता सरकारने 1800 केंद्र चालकांचे थकलेले दोनशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे

राज्यभरात 1800 शिवभोजन थाळी केंद्रे आहेत. कोरोनाकाळात 10 रुपयांत मिळणाऱया या शिवभोजन थाळी केंद्रांचा गरीब गरजू नागरिक, बांधकाम मजुरांना या थाळीचा मोठा आधार मिळाला. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ही योजना पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दरवर्षी अर्थसंकल्पात 270 कोटींची तरतूद करण्यात येत होती. मात्र महायुती सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठीच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाल्याने या योजनेकडे दुर्लक्ष झाले. ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर असून काही केंद्र चालकांना डिसेंबरपासून तर काही केंद्र चालकांना फेब्रुवारीपासून अनुदान मिळालेले नाही. या शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे सुमारे 200 कोटी रुपये सरकारकडे थकीत राहिल्याने केंद्र चालक आर्थिक अडचणीत सापडले. केंद्रचालकांनी ‘शिवभोजन संघटना’ स्थापन केली. सात महिन्यांपासूनची थकित बिले मिळालीच पाहिजेत अशी मागणी करीत या केंद्र चालकांनी सर्व मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

केंद्र चालविण्यासाठी द्यावे लागणारे जागेचे भाडे, कामगारांचे पगार, किराणामालाचे थकलेले बिल यामुळे केंद्र चालविण्यात अडचणी निर्माण झाल्याचे पत्र या केंद्र चालकांकडून सरकारला देण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांना निवेदन देऊनही सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे केंद्र चालकांचे म्हणणे होते. या विषयावर मंत्रिमंडळ बैठकीत आज चर्चा करण्यात आली. त्यानुसार केंद्र चालकांचे थकलेले बिल देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

तरतूद फक्त 270 कोटींची

सरकारकडून अर्थसंकल्पात शिवभोजन थाळी योजनेसाठी 270 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीची गरज होती  मात्र यंदा केवळ 70 कोटींची तरतूद करण्यात आली असून मात्र त्यापैकी केवळ 20 कोटी रुपयांचेच वितरण झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून राज्यभरात दररोज अडीच लाख गरजूंना दहा रुपयांत थाळी दिली जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगलीतील 9 हजारांवर शिक्षकांना धक्का, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आता ‘टीईटी’ची सक्ती; 52 वर्षांच्या आतील गुरुजींना द्यावी लागणार परीक्षा सांगलीतील 9 हजारांवर शिक्षकांना धक्का, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आता ‘टीईटी’ची सक्ती; 52 वर्षांच्या आतील गुरुजींना द्यावी लागणार परीक्षा
दोन महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये ‘शालार्थ आयडी’ घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील शिक्षकांच्या नियुक्तीची पडताळणी सुरू करण्यात आली होती. शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण...
कोल्हापूर महापालिका प्रभागरचनेवर 55 हरकती, 22 सप्टेंबरपर्यंत होणार सुनावणी
रसायनयुक्त बनावट देशी दारू बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कराड शहर पोलिसांची कारवाई; 11 लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक
पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे, कॉरिडॉर करून पर्यटनस्थळ बनवू नका; ऍड. जगदीश शेट्टी यांची मागणी
शक्तीपीठ महामार्ग अनावश्यक, राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा; न्यायालयात जाणार! – राजू शेट्टी
सोलापुरात आरक्षणासाठी बंजारा समाजाचा मोर्चा
सात जोडपी घटस्फोटाच्या उंबरठ्यावरून मागे फिरली, लोकअदालतीची यशस्वी शिष्टाई