चिपळुणातील मोरवणे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव, बाहेरच्यांना जमीन विकण्यास बंदी

चिपळुणातील मोरवणे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव, बाहेरच्यांना जमीन विकण्यास बंदी

चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावकऱयांनी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठराव एकमुखाने मंजूर केला. या ठरावानुसार गावातील जमीन गावातील व्यक्तीलाच विकणे बंधनकारक करण्यात आले आहे. गावातील जमीन गावाबाहेरील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तीला विकता येणार नाही. एखाद्या कुटुंबाला पैशाची गरज भासल्यास ती जमीन फक्त गावातील व्यक्तीलाच विकावी लागेल.

गेल्या काही वर्षांत कोकणातील निसर्गरम्य गावांमधील जमीन परप्रांतीय लोक खरेदी करत आहेत. चांगले हवामान आणि परवडणाऱया दरात जमीन मिळत असल्याने बाहेरच्या लोकांनी मोठय़ा प्रमाणावर कोकणात जमिनी खरेदी केल्या. या खरेदीमुळे स्थानिकांच्या भविष्यातील पिढय़ांसाठी जमीन उरणार नाही, अशी भीती सातत्याने व्यक्त केली जात होती. मोरवणे ग्रामसभेच्या निर्णयामुळे या व्यवहारांना आळा बसणार आहे. ़

गावची जमीन गावातच राहणार

मोरवणे ग्रामसभेचा हा ठराव केवळ एक निर्णय नाही तर गावाच्या एकात्मतेचा आणि दूरदृष्टीचा पुरावा मानला जात आहे. गावकऱयांचे हक्क अबाधित ठेवत भविष्यातील पिढय़ांना शेती व घरजमिनींची कमतरता भासू नये, यासाठी ही पाऊले उचलली गेली आहेत. परिणामी ‘गावची जमीन गावातच’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून स्थानिकांचे स्वाभिमानाचे हे एक भक्कम पाऊल ठरले आहे.

गावाचा सामाजिक समतोल बिघडतो

बाहेरचे लोक पैशाच्या जोरावर जमीन घेतात आणि गावाचा सामाजिक समतोल बिघडतो. स्थानिक तरुणांना शेतीसाठी किंवा घरे बांधण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे हा ठराव अत्यावश्यक असल्याचे मत एकमुखाने मांडण्यात आले. अखेरीला सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;