IND VS PAK फ्लॉप शो! मैदान रिकामे, ना कुठे स्क्रीन ना कुठे चर्चा; पाकिस्तानविरोधातील सामन्याला देशभक्तांनी सपशेल नाकारलं
हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा क्रीडा विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय सामन्यांपैकी एक. या सामन्याची अवघे विश्व आतुरतेने वाट पाहत असते. मात्र आजच्या सामन्याच्या वेळी हे चित्र फार वेगळं पाहायला मिळालं. पहलगाम हल्ल्यामुळे संतापलेल्या हिंदुस्थानी देशभक्तांनी या सामन्याला सपशेल नाकारल्याचे दिसत आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील सामना हा हायव्होल्टेज सामना मानला जातो. हा सामना जाहीर झाला की त्या दिवशी रस्त्यावर शुकशुकाट असतो. प्रत्येक कॉलनी, इमारतींमध्ये मोठ मोठे स्क्रिन लावून हा सामना पाहण्याचे नियोजन केले जाते. मात्र यंदा असा कोणत्याही प्रकारचा माहोल दिसलेला नाही. ना कुठे स्क्रिन होत्या ना कोणत्या रेस्टॉरंट्सनी या सामन्याच्या निमित्ताने ऑफर काढल्या होत्या. त्यामुळे एकंदरीत या देशभक्त नागरिकांनी या सामन्याकडे पाठ फिरवली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List