India vs Pakistan Match – थोडी तरी लाज बाळगा! पीडित कुटुंबीयांचा आक्रोश
पहलगाम हल्ल्यात बळी गेलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिने सरकारवर जोरदार हल्ला केला. ‘पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या दहशतवादाला व निष्पाप लोकांच्या मृत्यूला आमंत्रण आहे. थोडी तरी लाज बाळगा, असा संताप आसावरी हिने व्यक्त केला.
पहलगाम हल्ल्यानंतर देशात अचानक देशभक्तीची लाट आली होती. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे बोलले गेले, पण पाकिस्तानशी मॅच झाली तर हा केवळ एक डायलॉग राहील.
क्रिकेटकडे खेळ म्हणून पाहा म्हणणारे अजित पवार ट्रोल
क्रिकेट मॅचकडे खेळ म्हणून पाहिले पाहिजे, त्यात राजकारण आणता कामा नये, असे म्हणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ट्रोल झाले. तुमचे कोणी गेले नाही म्हणून तुम्हाला हे सुचते आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी केली.
माझ्या लोकांचं रक्त सांडलं त्यांच्याशी आपण का खेळावं
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास विरोध दर्शवला. ‘माझ्या लोकांचं रक्त सांडणाऱयांच्या सोबत मी का खेळावं? हिंदुस्थानने खेळू नये’, असे स्पष्ट मत त्यांनी नोंदवले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List