ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानींसह स्थलांतरितांविरुद्ध प्रदर्शनं, काय आहे कारण? वाचा…
ऑस्ट्रेलियात रविवारी अनेक शहरांत स्थलांतरितांविरोधात प्रदर्शनं करण्यात आली. या प्रदर्शनांमध्ये हिंदुस्थानी स्थलांतरितांनाही लक्ष्य करण्यात आलं. . ‘मार्च फॉर ऑस्ट्रेलिया’ या नावाने या रॅलीचं आयोजित करण्यात आलं होतं. ज्यात सिडनी, मेलबर्न आणि कॅनबेरा यांसारख्या शहरांमध्ये हजारो लोक सहभागी झाले. सिडनीमध्ये ५,००० हून अधिक लोक एकत्र आले आणि ऑस्ट्रेलियेचे राष्ट्रीय ध्वज घेऊन मार्च काढला.
का करण्यात आली प्रदर्शनं?
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलकांचा दावा आहे की, गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थानी स्थलांतरितांची संख्या खूप वाढली असल्यामुळे ऑस्ट्रेलियाची संस्कृती आणि संसाधने यावर वाईट परिणाम होत आहे. या आंदोलनांदरम्यान आंदोलकांची पोलिसांशी झटापटी झाली. सिडनी आणि मेलबर्नमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे पोलिसांना मिरची स्प्रेचा वापर करावा लागला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List