मी दलाली करीत नाही, कष्टाने पैसे मिळवतो; महिन्याला 200 कोटी कमावण्याची माझी क्षमता
मी दलाली किंवा फसवणूक करीत नाही. मला मेहनतीने, प्रामाणिकपणाने पैसे कमवायचे चांगलेच माहित आहे. महिन्याला 200 कोटी रुपये कमाई करण्याची माझ्याकडे बुद्धी आहे, असे मत पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. कमाईसंदर्भातील विधानामुळे ते नव्याने चर्चेत आले आहेत.
इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांची स्थिती खराब झाल्याच्या तक्रारी अनेकजण करीत आहेत. याचदरम्यान गडकरींनी त्यांच्या कमाईच्या क्षमतेबाबत विधान केले आहे. माझ्याकडे पैशांची कुठल्याही प्रकारे कमतरता नाही. प्रत्येक महिन्याला 200 कोटी रुपये कमवण्याची बुद्धी माझ्याकडे आहे. मी मुलांना बिझनेसच्या आयडिया देतो. प्रामाणिकपणे पैसे कसा कमवायचा हे मला ठाऊक आहे. मी दलाली किंवा फसवणूक करत नाही, असे ते म्हणाले. नागपूरमध्ये सेंद्रिय शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी तीन ते चार ठिकाणी दुकाने उपलब्ध करून देत आहे. मी हे केवळ कमाईसाठी करत नाही, तर याचा शेतकऱयांनाही फायदा मिळावा हा माझा उद्देश असतो. माझ्या मुलाने इराणमधून 800 पंटेनर सफरचंद आणली आणि तिथे 1000 पंटेनर केळी पाठवली. यातून खूप फायदा झाला, असेही त्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List