बीएमडब्लू कारची दुचाकीला धडक, अर्थ मंत्रालयातील अधिकारी ठार; पत्नी गंभीर जखमी
भरधाव बीएमडब्लूने दुचाकीला धडक दिल्याने अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. दिल्लीतील धौला कुआं जवळील रिंग रोडवर रविवारी हा अपघात झाला. नवजोत सिंह असे मयत अधिकाऱ्याचे नाव असून ते अर्थ मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत होते. दिल्ली पोलिसांनी बीएमडब्लू कार जप्त केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
नवजोत सिंह हे पत्नीसह बंगला साहिब गुरुद्वारात गेले होते. तेथून हरी नगर स्थित घरी परतत होते. यादरम्यान रिंग रोडवर त्यांच्या दुचाकीला बीएमडब्लू कारने धडक दिली. या अपघातात दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. नागरिकांनी दोघांना तात्काळ न्यू लाईफ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी नवजोत यांना मृत घोषित केले तर पत्नीवर उपचार सुरू आहेत. सदर कार एक महिला चालवत होती. पोलिसांनी कार जप्त केली असून महिलेविरोधात हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List