Israel Attack On Gaza : इस्रायलचा गाझावर पुन्हा प्रहार, 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
इस्रायलने पुन्हा एकदा गाझावर हल्ले करायला सुरुवात केली आहे. यादरम्यान, इस्रायलने शुक्रवारी गाझातील वेगवेगळ्या लष्करी भागात हल्ले चढवले. यामध्ये सुमारे 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या मते, त्यांना गाझातील सर्वात मोठे शहरी केंद्र ताब्यात घ्यायची आहेत. कारण हे पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासचा शेवटच्या समूहांपैकी एक आहे. याआधी हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता आणि 1400 लोकांचा बळी घेतला होता. तसेच 250 हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते. याचाच सूड म्हणून इस्रायल गाझातील हमासच्या उरलेल्या तळांना सतत लक्ष्य करत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलकडून गाझावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांबद्दल गंभीर इशारा दिला आहे. आम्हाला भीती आहे की, यामुळे गाझा शहरातील गंभीर असलेली मानवतावादी परिस्थिती आणखी बिकट होईल. गाझाला दुष्काळासारख्या परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांनी एका संयुक्त निवेदनात या हल्ल्यांना लवकरात लवकर थांबवण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यांमुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. तसेच, पायाभूत सुविधांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इस्त्रायलचा गाझावर हवाई हल्ला, 81 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू, 400 हून अधिक जखमी
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List