नागपुरात घराच्या बाल्कनीतून गेला फ्लायओव्हर
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया कडून बांधण्यात आलेल्या एका फ्लायओव्हरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या पुलावरून दररोज लाखो वाहने ये-जा करतील, त्या पुलाला चक्क एका घराच्या बाल्कनीतून नेण्यात आले आहे. त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. नागपूर शहरातील अशोक चौक येथे सुरू असलेल्या इंडोरा-डिघोरी फ्लायओव्हर प्रकल्पामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 998 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. परंतु, इतका खर्च करण्यात येत असला तरी हा फ्लायओव्हर एका घराच्या बाल्कनीतून जात आहे. त्यामुळे अनेक जणांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काही लोकांनी चिंता व्यक्त केलीय. उंच रोटरीचा भाग घराच्या बाल्कनीशी एवढा जवळ पोहोचला आहे की तो थेट बाल्कनीच्या मधोमध जातोय. सोशल मीडियावर या दृश्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेकांनी याला ‘इंजिनिअरिंगचा करिश्मा’ म्हटलं आहे, तर काहींनी ‘योजना अपयशाचं उदाहरण’ म्हणत या सर्व प्रकारावर टीका केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List