सुशीला कार्की पंतप्रधानपदी, सरकार बरखास्त नेपाळमध्ये अंतरिम सरकार

सुशीला कार्की पंतप्रधानपदी, सरकार बरखास्त नेपाळमध्ये अंतरिम सरकार

‘जेन-झी’च्या अभूतपूर्व क्रांतीनंतर नेपाळमध्ये अंतरिम सरकार अस्तित्वात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायधीश सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. दरम्यान, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी संसद बरखास्त केली आहे.

गेल्या चार दिवसांत नेपाळमध्ये अनेक राजकीय उलथापालथ झाली. ‘जेन-झी’ने के. पी. शर्मा ओली यांची सत्ता उलथून टाकली. ओली अज्ञातस्थळी पळून गेला. संसद भवन, सर्वोच्च न्यायालयापासून अनेक सरकारी इमारतींना आगी लावण्यात आल्या. या हिंसक आंदोलनात 20वर लोकांचा बळी गेला. नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचाली दोन दिवसांपासून सुरू होत्या. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, लष्करातील अधिकारी आणि ‘जेन-झी’चे प्रतिनिधी यांच्यात अनेकदा चर्चांच्या फेऱ्या झाल्या. सुरुवातीला काठमांडूचे महापौर बालेन शाह यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, शुक्रवारी सायंकाळी संसद बरखास्त करावी आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या सुशीला काकाa यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करावी, यावर एकमत झाले. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास राष्ट्रपती भवनात कार्की यांना अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली. यावेळी राष्ट्रपती भवन परिसरात लष्करी जवान तैनात करण्यात आले होते.

तिघांना मंत्रिपदाची शपथ; सरकारमध्ये ‘जेन-झी’चा समावेश नाही

राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या शपथविधीवेळी कुलगाम जिसिंग, ओम प्रकाश अर्याल आणि बालानंद शर्मा या तिघांना मंत्रिपदाची शपथ दिली. या अंतरिम सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये ‘जेन-झी’ निदर्शकांचा कोणताही नेता समाविष्ट झालेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कल्याण-डोंबिवली पालिकेला मानवाधिकार आयोगाने ठोठावला दंड, प्रतिज्ञापत्र सादर न करणे भोवले कल्याण-डोंबिवली पालिकेला मानवाधिकार आयोगाने ठोठावला दंड, प्रतिज्ञापत्र सादर न करणे भोवले
आदेश देऊनही प्रतिज्ञापत्र सादर न झाल्याने मानवाधिकार आयोगाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयोगाचे अध्यक्ष ए. एम....
तुमच्या चुकीचा त्रास लोकांनी का भोगायचा? खड्ड्यांवरून हायकोर्टाने प्रशासनाला झापले, सहाय्यक आयुक्तांना सुनावणीला हजर राहण्याचे आदेश
मध्य रेल्वेवर उद्या ठाणे ते कल्याणदरम्यान मेगाब्लॉक
Video – कर्नाटकात गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसल; 8 जणांचा मृत्यू, 25 गंभीर जखमी
विमानतळावरून बांगलादेशीला अटक
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 13 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
मराठी साहित्य संघ निवडणुकीत मंत्री लोढांचे मतदान चर्चेत