शेअर बाजार वधारला, निफ्टी 25 हजारपार
शेअर बाजारात शुक्रवारी चांगलीच तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 355 अंकांनी वधारून 81,907 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 105 अंकांनी वाढून 25,111 अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये सलग आठव्या दिवशी वाढ झाली. 25 जुलैनंतर निफ्टी पहिल्यांदा 25 हजारपार पोहोचले. निफ्टीतील भारत इलेक्ट्रॉनिक्स, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, हिंडाल्को, ऑक्सिस बँक, एलअँडटी, इन्पहसिस, टाटा मोटर्स, मारूती, बजाज फिनसर्वच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List