दुचाकी प्रवेशबंदीवरून पोलिसांचा एका दिवसात यू-टर्न ; सकाळ व सायंकाळच्या सुमारास घेतलेला दुचाकी बंदीचा निर्णय रद्द

दुचाकी प्रवेशबंदीवरून पोलिसांचा एका दिवसात यू-टर्न ; सकाळ व सायंकाळच्या सुमारास घेतलेला दुचाकी बंदीचा निर्णय रद्द

हिंजवडी वाकड उड्डाणपुलावर होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवारपासून (दि. 11) दुचाकीचालकांना या पुलावरून जाण्यास प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश बंदी लागू करण्यात आली. मात्र, हिंजवडीतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी काढलेला तोडगा दुचाकीचालकांच्या पचनी पडला नाही. दुचाकीचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने उड्डाणपुलावरील दुचाकी प्रवेशबंदीवरून वाहतूक पोलिसांना एका दिवसात यू-टर्न घेण्याची वेळ आली. हा प्रयोग केवळ एका दिवसासाठी राबविण्यात आला होता, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

हिंजवडी-वाकड पुलावर होणारी वाहतूककोंडी ही स्थानिक नागरिकांबरोबरच आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना भेडसावणारी मोठी समस्या आहे. ही बाब लक्षात घेऊन हिंजवडीतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी गुरुवारपासून (दि. 11) दुचाकीचालकांना या पुलावरून जाण्यास प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. दुचाकींमुळे होणारी वाहतूककोंडी आणि इतर समस्या कमी करण्यासाठी हा प्रयोग राबवण्यात आला. या निर्णयामुळे कार्यालयीन वेळेत या पुलावर होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यास कार्यालयीन वेळेत वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त केली जात होती.

सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत दुचाकीस्वारांना या पुलाचा वापर करता येणार नव्हता. त्यामुळे चारचाकी आणि इतर प्रवासी वाहनांना अडथळ्याशिवाय पुलावरून जाता येणे शक्य होणार होते. वाहनचालकांचा गोंधळ होऊ नये, यासाठी गुरुवारी सकाळपासूनच वाहतूक पोलीस तसेच ट्रॅफिक वॉर्डन प्रवेश बंदीचे फलक हातात घेऊन पुलाच्या दोन्ही बाजूंना थांबवण्यात आले. या वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचनाही दुचाकीस्वारांना देण्यात येत होत्या. त्यामुळे कार आणि इतर प्रवासी वाहनांना अडथळ्यांशिवाय पुलावरून जाता येणे शक्य होत होते. वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाबाबत दुचाकीचालकांनी मात्र, नाराजी व्यक्त केली. वाहतूक शाखेने कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा अधिसूचना न काढता, दुचाकी चालकांसाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला. अनेकजण कोंडी टाळण्यासाठी दुचाकीने हिंजवडीतील कार्यालयात येतात. मात्र, आता हिंजवडीला जोडणाऱ्या पुलावरच कर्मचाऱ्यांना वळसा घेऊन कार्यालयात जावे लागणार आहे. दुसरीकडे हिंजवडीकडे जाणारे सर्वच भुयारी मार्ग हे खराब अवस्थेत आहेत. त्यामुळे भुयारी मार्गातून दुचाकीवरून प्रवास करणे धोकादायक असल्याचे म्हणणे दुचाकीचालकांनी व्यक्त केले. दुचाकी चालकांनी सोशल मीडियावरूनही वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला. अखेर एका दिवसात वाहतूक पोलिसांना या निर्णयावरून यू-टर्न घेण्याची वेळ आली आणि प्रायोगिक तत्त्वावर घेतलेला हा निर्णय रद्द करावा.

हिंजवडी-वाकड पुलावर दुचाकींना घालण्यात आलेली बंदी ही एका दिवसासाठी प्रायोगिक तत्त्वावर होती. गुरुवारी सकाळी पहिल्यांदा हा प्रयोग झाला. त्याचा परिणाम चांगला दिसून आला. वाहनचालकांचे या निर्णयाबाबत काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्यात येईल. त्यावरून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
विवेक पाटील (पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अवघ्या काही मिनिटात तुटलेली हाडे जोडली जाणार… जगातील पहिला बोन ग्लू तयार अवघ्या काही मिनिटात तुटलेली हाडे जोडली जाणार… जगातील पहिला बोन ग्लू तयार
चिनी शास्त्रज्ञांनी एक वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वाचा शोध लावला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी जगातील पहिला ‘बोन ग्लू’ तयार केला आहे. हा...
मणिपूरच्या नावातच ‘मणि’ आहे! 3 वर्षांपासून धगधगणाऱ्या मणिपूरमध्ये पहिल्यांदाच पोहोचले मोदी, म्हणाले…
तुळजाभवानीचं ‘पेड’ दर्शन महागलं, शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानचा दरवाढीचा निर्णय
‘शक्तिपीठ’ साठी अट्टाहास; मात्र, समांतर पुलाचा उपहास
राहुरीत दहा दिवसांत अपघातांत आठ लोकांचा बळी; अहिल्यानगर-मनमाड महामार्ग संतप्त नागरिकांनी रोखला
महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस !
अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना जोरदार टोला